प्रशासनातील जुन्या जाणत्या अधिकाऱ्याकडे राज्याच्या मुख्य सचिवपदाची जबाबदारी
मुंबई | प्रशासनातील जुने जाणते अधिकारी म्हणून ओळखले जाणारे सीताराम कुंटे यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी निवड झाली आहे. तर मनुकुमार श्रीवास्तव राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव असणार आहेत. सीताराम कुंटे 1985च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. तर मनुकुमार श्रीवास्तव हे 1986 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यालयानं ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.
राज्याचे विद्यमान मुख्य सचिव संजय कुमार 28 फेब्रुवारीला सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांना महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे (एमईआरसी) पाठविण्यात येत असल्याची माहिती आहे. तर एमएमआरडीएचे प्रमुख आर. ए. राजीव यांनाही 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्याच्या मुख्य सचिवपदासाठी 1985 च्या बॅचच्या सीताराम कुंटे आणि प्रवीण परदेशी यांची नाव चर्चेत होती. मात्र राज्य शासनाने सीताराम कुंटेंच्या नावाची घोषणा केली आहे. सीताराम कुंटे यांनी 2012 ते 2015 या कालावधीत मुंबई महापालिकेचे आयुक्तपद तर मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणूनही काम पाहिलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक विभाग हाताळण्याचा अनुभव त्यांना आहे. सीताराम कुंटे येत्या नोव्हेंबर महिन्यात निवृत्त होणार आहेत.
थोडक्यात बातम्या-
सावधान! …म्हणत ‘ते’ मुलींच्या काही प्रायव्हेट पार्टला लावायचे हात, मुंबई सायबर सेलची मोठी कारवाई!
‘मला ‘या’ दिवशी एक दिवसाचा मुख्यमंत्री करा’; अभिजित बिचुकलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
चित्रा वाघ यांच्या मॉर्फ केलेल्या फोटोवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले….
ठाकरे सरकारमधील धनंजय मुंडे, राठोड यांच्यानंतर आता संजय राऊतांवर आरोप
अबब! चोरी करण्यासाठी चोराची आयडियाची कल्पना, चोरली तब्बल 400 किलो चांदी
Comments are closed.