Top News राजकारण

इच्छा नसताना दबावामुळे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारली; नितीश कुमारांचा खुलासा

बिहार | बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करून 2 महिने उलटले आहेत. मात्र अजूनही कॅबिनेटचा विस्तार तसंच विधान परिषदेच्या जागांबद्दल निश्चितता झालेली नाहीये.

यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एक मोठं विधान केलंय. मला मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नव्हती पण दबावामुळे आपण ही जबाबदारी स्वीकारली असल्याचं, त्यांनी सांगितलंय.

कार्यकारणीच्या बैठकीदरम्यान नितीश कुमार म्हणाले, निवडणुकीत माझे लोक कमी जिंकले त्यामुळे मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नव्हती. मात्र मी मुख्यमंत्री जेडीयू आणि भाजपामुळे झालो.

यापूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी, निवडणुकीत माझा मित्र कोण आणि शत्रू कोण? हे माहिती नव्हतं, असं विधान केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

भारतीय खेळाडूंवरील वर्णद्वेषी टीकेवरुन सचिन तेंडुलकरचा संदेश, म्हणाला…

राज्यावर बर्ड फ्लूचं सावट?; लातूर तसंच बीडमध्ये पक्षी-कोंबड्यांचा मृत्यू

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव, परभणीत 800 कोंबड्यांचा मृत्यू

“खरं तर सत्तारांचे केसच उगवू देणार नव्हतो, पण आता टोपी निघू देणार नाही”

‘थोडं राजकारण कमी करा आणि…’; भंडाऱ्यातील दुर्घटनेनंतर सामनातून राऊतांचा केंद्राला सल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या