महाराष्ट्र मुंबई

शिवसेनेच्या बॅनरवर आता फक्त ठाकरे…

मुंबई | स्वत:चे फोटो बॅनरवर झळकवणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बॅनरबाजीला लगाम घालण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कडक भूमिका घेतली आहे.

बॅनरवरील फोटोवरुन शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा होणारा वाद टाळण्यासाठी शिवसेनेने स्थानिक पदाधिकाऱ्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही पदाधिकाऱ्यांचे फोटो वापरण्यास बंदी घातली आहे.

शिवसेनेच्या विभागप्रमुखांची बैठक ‘मातोश्री’ पार पडली. या बैठकीत आचारसंहिता जारी केली. यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना सांगण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

स्थानिक पातळीवरील शिवसेनेच्या कार्यक्रमाचे किंवा एखाद्या सूचनेचे बॅनर लावताना दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांमध्ये टोकाचे वाद होत होते म्हणून शिवसेनेने हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-कोरेगाव भिमा प्रकरणातील खटले मागे घ्या; रिपब्लिकनच्या आठवले गटाची मागणी

-शेतकऱ्यांसाठी मोर्चा ही शिवसेनेची फक्त नौटंकी- विजय वडेट्टीवार

-असले चिछोरे चाळे करणे बंद करा; पंकजा मुंडे यांचा धनंजय यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा

-फायनल सामन्यअगोदर न्यूझीलंडने भारतीय क्रिकेटप्रेमींना केलं ‘हे’ आवाहन!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या