Top News पुणे महाराष्ट्र

“पुण्यातील कंन्टेमेंंट झोनमधील निर्बंध अधिक कडक करणार”

पुणे | पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत असून शहरासह ग्रमीण भागातीलही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे पुण्यातील कंन्टेमेंट झोनमधील निर्बंध अधिक करणार असल्याचं पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितलं आहे.

अभिनव देशमुख यांनी रविवारी बारामतीचे अपर पोलिस अधिक्षक  मिलिंद मोहिते यांच्याकडून पुणे अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पूर्वी कोरोनाविषयी असलेली भिती आता कमी झाली आहे. मात्र निष्काळजी न करता सर्तक राहणे गरजेचे आहे, असं डॉ. अभिनव देशमुख यांनी लाकमतशी बोलताना सांगितलं आहे.

कोरोनाची लागण झाली तर 90 टकके लोक बरे होतात. परंतू त्याचबरोबर आपण काळजीही घेतली पाहिजे. नियमित मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे हे नियम पाळले पाहिजेत. तसेच लक्षणे दिसल्यास तातडीने तपासणी करणे गरजेचे आहे, असंही डॉ. देशमुख यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुणे जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थीती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

महत्वाच्या बातम्या-

उत्तर प्रदेश सरकार उभारणार सर्वात मोठी फिल्मसिटी; योगी आदित्यनाथ यांनी केली घोषणा

IPL2020- जॉर्डनची शेवटी ओव्हर पडली महागात, ‘या’ विक्रमात जोडलं नाव

IPL2020- सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात अवघ्या 3 धावांनी दिल्लीची पंजाबवर मात

“उद्धवजी…तुमची प्रतिमा कशीही असो, किमान महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होणार नाही ही काळजी घ्या”

राज्यसभेतील गोंधळ दुर्देवी आणि लज्जास्पद- राजनाथ सिंग

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या