बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुळे ‘या’ राज्यातून महाराष्ट्रात जाण्या-येण्यावर निर्बंध; बससेवा केली बंद

मुंबई | राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर कडक नियम तयार करण्यात आले आहेत, काही ठिकाणी नाईट कर्फ्यूही लागू करण्यात आला आहे. वाढत्या कोरोनामुळे आता महाराष्ट्राजवळील राज्यांनीदेखील खबरदारी घ्यायाला सुरुवात केली आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रात येण्या-जाण्यावर निर्बंध घातले आहेत. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील बससेवा बंद ठेवली जाणार आहे. 20 मार्चपासून बससेवा बंद होईल. त्यामुळे या दोन्ही राज्यात जाता येता येणार नाही.

कोरोना रुग्णांच्या आकड्यांचा आलेख फेब्रुवारीपासून वेगाने वाढतो आहे. गुरुवारी या संख्येने कहर केला आणि महाराष्ट्रात नवीन रुग्णसंख्येच्या सप्टेंबरच्या आकड्यालाही मागे टाकलं. गेल्या 24 तासांत राज्यात 25833 नवे रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट झाला आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासांत एकट्या पुणे शहरातच 2752 नव्या रुग्णांंची भर पडली आहे तर 28 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत पुण्यात कोरोनाबळींच्या संख्येने 5 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

थोडक्यात बातम्या- 

मुंबईकरांनी भारतीय संघाला सावरलं, अटीतटीच्या सामन्यात भारताचा इग्लंडवर विजय

“युपीएचं पुनर्गठन करा, सोनियांच्या जागी शरद पवार यांना अध्यक्षपदी बसवा”

शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांना कोरोनाची लस द्यावी- राकेश टिकैत

पुण्यात लुटमारीसाठी दुकानदारावर गोळीबार; पोलिसांनी रचला सापळा आणि…

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्याच चेंडूवर गगनचुंबी षटकार ठोकत सुर्यकुमारने रचला इतिहास, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More