बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ शहरातील लग्नावरील निर्बंध उद्यापासून हटणार; हॉटेलही पूर्ण क्षमतेने होणार सुरू

सोलापूर | महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने राज्यभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन घोषित केला होता. परंतु, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनलॉकला सुरुवात झाली आहे.

सोलापूरमध्ये कोरोना आटोक्यात आल्याने हळूहळू निर्बंध शिथील करण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूरमधील लग्न सोहळ्याचे निर्बंध आता उद्यापासून उठवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्व व्यवहार आता सुरळीत होणार आहेत.

सोलापूरमधील कोरोना आटोक्यात आल्याने निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शहरातील सर्व हॉटेल्स पूर्ण क्षमतेने सुरळीतपणे सुरु होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सोलापूर शहर अनलाॅकच्या पहिल्या टप्प्यात आल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत.

सध्या सोलापूरमध्ये 0.75 टक्के कोरोना संसर्गाचा दर आहे. तसेच कोरोना बेड्सचा वापर 30 टक्क्यांच्या आत आहे. त्यामुळे आता सर्व व्यापार व व्यवहार सुरळीत होणार आहेत. सध्या महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये नागरिकांना अनलॉकमधून सुट देण्यात आली आहे. हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र पूर्व पदावर येताना दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या

आयफोनमधून झाले तरुणीचे न्यूड फोटो सोशल मीडियावर लीक, अ‌ॅपल कंपनी देणार करोडोंची भरपाई

“वाघाच्या मिशीला हात लावायला सुद्धा हिंमत लागते, या मी वाट पाहतोय मग बघू”

“गुलामासारखी वागणूक मिळत होती तर तेव्हा तुमचं तोंड शिवलं होतं का?”

‘शिवबांचे खरे वैचारिक वारसदार असाल तर…’; आरक्षणासाठी नक्षलवाद्यांनी काढलेल्या पत्रकाला संभाजीराजेंचं उत्तर

‘तिचे माझ्या बहिणीच्या नवऱ्यासोबत संबंध होते’; राज कुंद्राचा खळबळजनक खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More