बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

त्यांना कामधंदा नाही म्हणून ‘ती’ गोष्ट उकरून काढताहेत- अजित पवार

पुणे | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक चकमक सुरूच आहे.  आता ज्यांना उद्योग नाही ते असले रिकामे मुद्दे उकरून काढतात, असं म्हणत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

जी गोष्ट झालेली आहे, तिला 14 महिने झाले आहे. आता ज्यांना उद्योग नाही ते असेल रिकामे मुद्दे उकरून काढतात. ही लोकं काही काळ आमच्या बरोबर होती, त्यांचा आवाका किती आहे हे आम्हाला माहित आहे. त्यामुळे जर भावनेच्या आहारी जाऊन काही जण बोलत असतील तर फार महत्त्व द्यायची गरज नाही, असं अजित पवार म्हणाले.

राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं छत्रपती शिवरायांना वंदन करतो, महाराष्ट्राला शुभेच्छा देतो. रयतेसाठी काम कसं करावं हे छत्रपतींनी शिकवलं. घराघरांवर ,ग्रामपंचायती, महाविद्यालयात, सगळीकडे गुढी उभारून हा शिवस्वराज्य दिवस साजरा केला जात आहे. रायगडावर सोहळा पाहून मोठा अभिमान वाटतो, अशी भावनाही अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली. आम्ही मराठा आरक्षणावर काम करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आजच्या दिवशी मराठा समाजाला मी आश्वासन देतो की, इतर कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचा प्रयत्न करणार, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.

दरम्यान, ग्रामविकास विभागानं आजचा दिवस शिवस्वराज्य दिवस सुरू करायचा निर्णय घेतला. शिक्षण विभागानं ही तसाच निर्णय घेतला आहे. कचरामुक्त पुणे जिल्हा अभियान सुरू आहे. 156 कोटी या अभियानासाठी दिले आहेत. तर खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी देखील पैसे मंजूर करून आणले आहेत, अशी माहितीही पवारांनी यावेळी दिली.

थोडक्यात बातम्या –

भारतात आढळला कोरोनाचा नवा घातक व्हेरियंट; रूग्णाच्या शरीरात होतोय ‘हा’ बदल

‘या’ कारणामुळे पुण्याची तिसऱ्या स्तरात घसरण झाली, अन्यथा निर्बंध हटले असते!

आता काय होईल ते होईल, मी मेलो तरी चालेल पण…- संभाजीराजे आक्रमक

रायगडावर संभाजीराजेंची गर्जना, पहिल्या मराठा मोर्चाची तारीख अन् ठिकाणही ठरलं!

माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा, पण दिशाभूल करणं रक्तात नाही- खासदार संभाजीराजे

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More