Crime News l एका निवृत्त लष्करी जवानाने आपल्या पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे (Pieces) केले आणि ते प्रेशर कुकरमध्ये (Pressure Cooker) शिजवून तलावात (Lake) फेकल्याची (Thrown) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेच्या आई-वडिलांनी (Parents) त्यांच्या बेपत्ता (Missing) मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केल्यानंतर हा क्रूर गुन्हा (Heinous Crime) समोर आला आहे. रंगारेड्डी (Rangareddy) जिल्ह्यातील मीरपेट (Mirpet) येथील रहिवासी (Resident) लष्कराचा माजी जवान (Ex-Army Soldier) गुरुमुर्ती (Gurumurthy) असे आरोपी पतीचे (Husband) नाव आहे. तर व्यंकटा माधवी (Venkata Madhavi) (35) असे मृत पत्नीचे नाव आहे.
या बातमीच्या माध्यमातून आपण या घटनेचा सविस्तर आढावा घेणार आहोत. हत्या कशी करण्यात आली, पुरावे (Evidence) नष्ट करण्याचा कसा प्रयत्न केला गेला आणि पोलिसांनी या प्रकरणाचा तपास कसा केला याबद्दल जाणून घेणार आहोत.
कौटुंबिक कलहातून घडली क्रूर घटना :
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला बेपत्ता असल्याने तिला शोधत तिचे कुटुंबीय सासरी पोहोचले. त्यावेळी आरोपीने भांडण (Argument) झाल्यामुळे पत्नी घरातून निघून गेली असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी पती हा आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार (Complaint) दाखल करण्यासाठी सासरच्या लोकांबरोबर पोलीस ठाण्यात (Police Station) गेला होता. पण याप्रकरणी पोलिसांना संशय (Suspicion) आल्याने त्यांनी पतीची चौकशी (Inquiry) केली. अधिकच्या चौकशी दरम्यान आरोपी पतीने पोलिसांसमोर पत्नीची हत्या केली असल्याचे कबूल केले.
पोलीस चौकशीत आरोपीने सांगितले की, त्यांच्या दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. 15 जानेवारी रोजीही त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले आणि त्यानंतर रागाच्या भरात (Anger) त्याने पत्नी माधवीची हत्या केली. दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारीला त्याने मृतदेहाचे तुकडे केले आणि ते कुकरमध्ये शिजवले. नंतर हाडे (Bones) मुसळाने (Pestle) बारीक करून मृतदेहाचे तुकडे तलावात फेकले.
Crime News l पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न :
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना हैदराबादच्या (Hyderabad) रंगारेड्डी जिल्ह्यातील मिरपेट भागात घडली आहे. या हत्येतील आरोपी पती हा निवृत्त लष्करी जवान असून, त्याने स्वेच्छा निवृत्ती (Voluntary Retirement) घेतली होती. निवृत्ती घेतल्यानंतर आरोपी डीआरडीओमध्ये (DRDO) आउटसोर्स्ड सिक्युरिटी गार्ड (Outsourced Security Guard) म्हणून काम करत होता. त्याचे आणि मृत महिलेचे 13 वर्षांपूर्वी लग्न (Marriage) झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. दरम्यान आरोपीने 15 जानेवारी रोजी पत्नीशी झालेल्या भांडणानंतर तिची हत्या केली आणि 16 जानेवारीला मृतदेहाची विल्हेवाट (Disposal) लावली. त्यानंतर 18 जानेवारी रोजी ही क्रूर घटना उघडकीस आली होती.
दरम्यान बुधवारी (Wednesday) रात्रीपर्यंत, मिरपेट येथील तलावात पीडितेच्या मृतदेहाचे कोणतेही अवशेष (Remains) पोलिसांना सापडले नव्हते. त्यामुळे यासाठी पोलिसांनी क्लूज (Clues) आणि श्वान पथक (Dog Squad) तैनात केले असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
News Title : Retired Army Soldier Murders Wife, Cooks Body Parts in Pressure Cooker