रांची | भारतीय टीमचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनीने आता आपला मोर्चा कुक्कुटपालनाकडे वळवला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सन्यास घेतल्यानंतर आता धोनी कडकनाथ कोंबड्यांची विक्री करणार आहे. धोनीने मध्य प्रदेशातील झाबुआच्या कडकनाथच्या 2 हजार पिल्लांसाठी आदिवासी शेतकऱ्याला ऑर्डरही दिलीये.
तीन महिन्यांपूर्वी धोनीचे शेती सांभाळणारे मॅनेजर कृषी विकास केंद्र आणि एमपी केदारनाथ मोबाईल ऍप द्वारे संपर्कात आले. पाच दिवसांपूर्वी त्यांनी 2 हजार कडकनाथ कोंबड्यांची ऑर्डर केली.
जुलै 2020 मध्ये धोनीचे शेतीत शेती करतानाचे फोटो देखील व्हायरल झाले होते. कुक्कुटपालनाप्रमाणे धोनी टीम आता डेअरी क्षेत्रातही उतरलीये. सहीवाल जातीच्या गाई धोनी टीमने विकत घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
खेळ तर आता सुरू झालाय…; तुरुंगातून सुटल्यानंतर अर्णब गोस्वामींचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
बिहारमध्ये शिवसेनेचं डिपॉझिट गुल.. कुठे गेला चमत्कार?; किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
“बिहारमध्ये सत्ता स्थापनेसाठी नितीश कुमारांनी शरद पवारांचा सल्ला घ्यावा”
कोरोनाला सणवार-दिवाळी कळत नाही; मुख्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन
बिहारच्या विजयी सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘या’ नेत्याला दिला मोठा इशारा