पुणे महाराष्ट्र

रिक्षावाल्या काकांकडून माणुसकीचं दर्शन, 11 तोळे सोनं असलेली बॅग केली परत

पुणे | पुण्यातील रिक्षाचालक विठ्ठल मापरे यांच्या रिक्षात एका दांपत्याकडून 11 तोळे सोनं असलेली बॅग विसरली. ती बॅग मापरे यांनी पोलिसांकडे दिली. पोलिासंनी त्या दांपत्यांना ही बॅग परत केली आहे.

11 तोळे सोनं असलेली बॅग रिक्षावाल्या काकांनी परत करून माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. प्रामाणिक रिक्षाचालक काकांची दखल पोलीस उपयुक्त सुहास बावचे यांनी घेऊन त्यांचा सत्कार केलाय.

कोरोनाने अनेक जण आर्थिक संकटात सापडलेत. तसेच अनेकांच्या नोकऱ्याही गेल्यात. कोरोनाचा फटका रिक्षावाल्यांना देखील बसलाय. मात्र अशा परिस्थिती देखील मनात कोणताही लालच न आणता रिक्षाचालक विठ्ठल मापरे यांनी 11 तोळे सोनं असलेली बॅग परत करून माणुसकीचे दर्शनच घडवलं आहे.

दरम्यान, रिक्षाचालक विठ्ठल मापरे यांच्या प्रामाणिक पणाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्र सरकारला कोरोनाशी नाही कंगणाशी लढायचं आहे- देवेंद्र फडणवीस

“…तर हा महाराष्ट्र आपल्याला कदापि माफ करणार नाही”

रिया आणि शौविक चक्रवर्तीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

मराठा आरक्षणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले…

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून होणार दंड वसूल- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या