बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

40 दिवसांत एका एकरातून शेतकऱ्यानं कमवले 3 लाख 60 हजार रुपये!

सोलापूर | कोरवली येथील शेतकरी रेवणसिद्ध गुरुसिद्ध कोरे यांनी केवळ एक एकर पाच गुंठे क्षेत्रात कलिंगडामधून तब्बल 3 लाख 60 हजार रुपयांचे उत्पन्न घेतलं आहे.

शेतजमीन मध्यम स्वरुपाची असली तरी त्याला पाणी अन् कष्टाची जोड असली की त्यातूनही सोनं पिकतं असं म्हटलं जातं. ही उक्ती रेवणसिद्ध कोरे यांनी तंतोतंत आचरणात आणली आहे. कोरवली येथे त्यांची केवळ सहा एकर शेतजमीन आहे. याच क्षेत्रावर त्यांनी अनेक पिकांचे वेगवेगळे प्रयोग केले आणि ते यशस्वीही झाले आहेत.

दोन महिन्यापूर्वी शेतीची मशागत करून एकरी दोन ट्रॉली म्हणजेच 20 टन शेणखत टाकले. त्यानंतर 6 फूट अंतराचे बेड तयार केले. त्यावर मल्चिंग पेपर अंथरुण ठिबक सिंचन केले़ त्यानंतर दीड फूट अंतरावर एक कलिंगडाचे रोप याप्रमाणे 6 हजार रोपांची लागवड केली.

दरम्यान, 8 ते दहा दिवसांच्या खतांची मात्रा, योग्य वेळी पाणी आणि रासायनिक खत व औषधांची मात्रा दिली. त्यामुळे केवळ दोन महिन्यांतच कलिंगड बाजारात विक्रिसाठी आले.

ट्रेंडिंग बातम्या- 

…म्हणून 19 जिल्हे वगळून शेतकरी कर्जमाफीची यादी जाहीर होणार!

एनपीआर आणि एनआरसी महाराष्ट्रात नको- नवाब मलिक

महत्वाच्या बातम्या- 

‘देशाचे पंतप्रधान स्वत: ओबीसी आहेत’; भुजबळांच्या ‘त्या’ मागणीवर फडणवीसांचं उत्तर

सुप्रिया सुळे वृत्त निवेदिकेच्या भूमिकेत; सांगितली अजित पवारांबाबातची बातमी

शिवरायांचा अपमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारचा दणका!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More