बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कुंद्राच्या काळ्या साम्राज्याचा राज उघड, व्हिडीओंसाठी घेतलेले पैसे ऐकाल तर थक्क व्हाल!

मुंबई |  अश्लील व्हिडीओ प्रकरणी उद्याोगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राज कुंद्राची 27 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणात सध्या धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. अशातच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या तपासातून या प्रकरणाबाबत धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

राज कुंद्रा त्याच्याजवळील 121 पॉर्न व्हिडीओंचा मोठा आंतरराष्ट्रीय करार असल्याची माहिती समजत आहे.  राज कुंद्राला त्यांच्याजवळील व्हिडीओचे तब्बल 8 कोटी 93 लाख 22 हजार 180 रुपयांना विकणार असल्याची माहिती समजली आहे. परंतू या व्यवहाराअगोदरच राज कुंद्राला अटक झाली.

पोलीस कुंद्राच्या येस बँक आणि युनायटेड बँक ऑफ आफ्रिकेतील खात्यांची आणि त्यामधून करण्यात आलेल्या व्यवहारांची चौकशी करत आहेत. राज कुंद्रा आपला पैसा बेटींगसाठी वापरत असल्याचा संशय पोलिसांना आहे.

अभिनेत्री सागरिका सोना सुमनने याप्रकरणाबाबत काही धक्कादायक खुलासे करत राज कुंद्रावर गंभीर आरोप केले आहेत. राज कुंद्राने एका फिल्मसाठी सागरिकाला न्यूड ऑडिशन देण्यास सांगितलं होतं. मात्र, सागरिकाने ते ऑडिशन देण्यास नकार दिला यामुळे सागरिकाला जीवे मारण्याची धमकी देण्यात येत होती, असा आरोप सागरिकाने केला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्राच्या स्थितीवर केंद्राचंही लक्ष, देवेंद्र फडणवीस यांचा दिल्लीशी संपर्क

कौतुकास्पद! 20 फूट पाण्यात उडी घेत तरूणाने देशी जुगाड करत 5 महिलांना आणलं मृत्युच्या दाढेतून माघारी

महाराष्ट्राला पावसाने झोडपलं, सुप्रिया सुळेंची केंद्राकडे मदतीची मागणी

“अतिवृष्टीग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा”

सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ, लवकरच 50 हजारापार जाण्याची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More