बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खून का बदला खूनसे! भारतीयांनी अवघ्या 24 तासांत केला दहशतवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली | सोमवारी पुंछ येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 5 भारतीय जवान शहीद झाले आहेत. याचा चोख बदला भारतीय जवानांनी घेतला आहे. पुंछ नंतर शोपीयान येथे पुन्हा एकदा दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. मात्र यावेळी भारतीय जवानांनी शहीद जवानांचा चांगलाच बदला घेत 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला .

गुप्त माहितीच्या आधारे सायंकाळी शोपियान येथे दोन सर्च ऑपरेशन हाती घेतले. यानंतर भारतीयांची शोपियान येथील तुलकरानमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. यावेळी भारतीयांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्याचवेळी खेरीपोरा येथे देखील एक ऑपरेशन सुरु करण्यात आलं. मात्र तेथील चकमक अद्यापही सुरु आहे.

खेरीपोरा येथील चकमक ही गेल्या 24 तासांतील तिसरी चकमक आहे. पुंछ येथे झालेल्या चकमकीत देखील भारतीयांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. म्हणजेच एकूण 5 दहशतवाद्यांना भारतीयांनी संपवलं आहे.

दरम्यान, ठार झालेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख समोर आलेली नसून त्यातील एका दहशतवाद्याचं नाव मुख्तार शाह असल्याचं समोर आलं आहे. ज्या ठिकाणी दहशतवाद्यांचा खात्मा केला त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रात वीजेची टंचाई होणार नाही?, ‘ही’ दिलासादायक माहिती आली समोर

“युद्ध झाले तर भारताचा पराभव अटळ”

बंजी जंपिंग जीवावर बेतलं, रस्सी तुटली अन् तीन मुलं झाली पोरकी, पाहा थरारक व्हिडीओ

“सत्तेत असून 100 टक्के बंद होत नसेल, तर तुमची काय लायकी आहे हे लक्षात येतं”

विराटनंतर आता ‘हा’ भारतीय खेळाडूही सोडणार आयपीएलचं कर्णधारपद?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More