बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सीईटी परिक्षेचं सुधारित वेळापत्रक जाहीर, ‘या’ कालावधीत होणार परिक्षा

मुंबई | MHT-CET परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांसाठी अत्यंत महत्वाची माहीती आहे. महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स (Maharashtra CET)द्वारे आयोजित करणाऱ्या सीईटी परिक्षेचं सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहे. परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी सविस्तर माहिती cetcell.mahacet.org या संकेत स्थळावर पाहू शकतात. परिक्षेच्या तारखांबद्दल आणि हॉलतिकिट(Hallticket) कधी जारी होणार याबद्दलची माहीतीही या संकेतस्थळावर (website) दिली आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार सीईटी परिक्षा 2 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या कालावधीत होणार आहेत. MHT-CET PCM ग्रुपच्या परिक्षा 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या वेळात तर PCB या ग्रुपच्या परिक्षा 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या कालावधीत होणार आहेत. पीसीएम (PCM Group) च्या ग्रुपचे हॉलतिकिट 26 जुलै रोजी जारी करण्यात येईल तर पीसीबी( PCB Group) ग्रुपचे हॉलतिकिट 2 ऑगस्ट रोजी जारी करण्यात येईल.

सध्या अभियांत्रिकी आणि इतर अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटी गुणांच्या आधारे केले जातात. पण पुढील वर्षापासून पदवीपूर्व व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमांची गुणवत्ता यादी जाहीर करताना बारावीच्या गुणांना आणि सीईटी परिक्षेतील कामगिरीला समान महत्व दिलं जाणार आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून विद्यार्थ्यांना बारावीतही चांगले गुण मिळवणे आवश्यक आहे.

दरम्यान, बारावी बोर्ड आणि सीईटी या दोन्ही परिक्षांच्या गुणांवर विद्यांर्थ्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. या गुणांवरूनच वि़द्यार्थ्यांना कोणते महाविद्यालय मिळणार हे निश्चित होतं. त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांनी बारावीच्या परिक्षेचा देखील चांगला अभ्यास करणे आवश्यक आहे. तर सीईटी परिक्षेसंंबंधी अधिक माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘मनसे म्हणजे एका आमदाराची अगरबत्ती’, दीपाली सय्यद यांनी मनसेला पुन्हा डिवचलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंबईकरांसाठी सर्वात मोठी घोषणा!

‘घटना सर्वांसाठी सारखीच’, संजय राऊतांचा शिंदे सरकारला इशारा

काळजी घ्या! ‘या’ जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार

‘शिवसेनेच्या अश्रुत हे सरकार वाहून जाईल’, संजय राऊत शिंदे सरकारवर बरसले

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More