मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका मागे घ्या- संभाजीराजे छत्रपती

नाशिक | मराठा समाजाचे आरक्षण इतर कुणाच्या वाट्याचे नाही. त्यामुळे त्याला विरोध करू नका. आपण सर्वजण एकत्र नांदू या मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका मागे घ्या, असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.

छावा क्रांतिवीर सेनेच्या अधिवेशनात संभाजीराजे बोलत होते. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळाले त्याचा मला आनंद आहे. असंही ते यावेळी म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या लढ्याची महाराष्ट्रानेच नाहीतर पूर्ण देशाने दखल घेतली आहे. आरक्षण मिळाले पण आता मिळालेले आरक्षण टिकविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

दरम्यान, छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांवरील धडे केवळ तिसरी चौथीत नव्हे, तर नववी-दहावीतही असावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

महत्वाच्या बातम्या –

विराट कोहलीला बाद ठरवण्याचा पंचांचा निर्णय साफ चुकीचा; सोशल मीडियावर एकच राडा

-मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका; अजित पवारांची कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती

-कोण जिंकणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी?, काय आहे सद्यस्थिती??? 

भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; सिंधूनं साऱ्या देशाची मान उंचावली

-राफेल प्रकरणी ‘भाजप’ देशभरात एकाच वेळी करणार ही रेकाॅर्डब्रेक कृती