RG Kar Rape-Murder Case | कोलकात्यातील (Kolkata) बहुचर्चित आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील (RG Kar Rape-Murder Case) बलात्कार आणि हत्या प्रकरणात अखेर निकाल लागला असून, न्यायालयाने आरोपी संजय रॉयला (Sanjay Roy) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेमुळे संजय रॉयला (Sanjay Roy) आता मरेपर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे.
कोलकात्याचे (Kolkata) न्यायाधीश जस्टीस अनिर्बान दास (Justice Anirban Das) यांनी हा निकाल दिला. पीडितेच्या कुटुंबियांना 17 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते, परंतु त्यांनी ही भरपाई घेण्यास नकार दिला आहे.
आधीच ठरला होता दोषी, आज झाली शिक्षा
या प्रकरणात संजय रॉयला (Sanjay Roy) आधीच दोषी ठरवण्यात आले होते. आज, या शिक्षेची सुनावणी होणार होती. त्यानुसार न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
निकालानंतरही आंदोलन सुरूच
आरजी कार (RG Kar) बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल लागला असला तरी, कोर्टाबाहेर नागरिकांचे आंदोलन सुरूच आहे. आंदोलकांच्या मते, या प्रकरणात संजय रॉय (Sanjay Roy) व्यतिरिक्त आणखी काही आरोपी सामील होते. त्यामुळे या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आंदोलक करत आहेत. (RG Kar Rape-Murder Case)
हा पुरावा ठरला निर्णायक
या प्रकरणात, केंद्रीय अन्वेषण विभागाने (Central Bureau of Investigation – CBI) फॉरेन्सिक तपासणीद्वारे (Forensic Investigation) सिद्ध केले की, पीडितेच्या नखाखाली सापडलेले नमुने संजय रॉयच्या (Sanjay Roy) डीएनएशी (DNA) जुळतात. याशिवाय, सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) आणि ब्लूटूथ हेडफोन्ससारखे (Bluetooth Headphones) इतर पुरावे देखील न्यायालयात सादर करण्यात आले. या पुराव्यांच्या आधारे, संजय रॉय (Sanjay Roy) हा या गुन्ह्यात एकटाच सहभागी होता, हे सिद्ध झाले. सीबीआयने (CBI) या प्रकरणात अनेक गुन्हेगार असण्याची शक्यता नाकारली होती. (RG Kar Rape-Murder Case)
आरजी कार (RG Kar) बलात्कार-हत्या प्रकरण नेमकं काय?
गेल्या वर्षी 9 ऑगस्ट रोजी कोलकात्यातील (Kolkata) सरकारी आरजी कार रुग्णालयात (RG Kar Hospital) एका 31 वर्षीय ज्युनियर डॉक्टरवर (Junior Doctor) बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तिचा मृतदेह रुग्णालयाच्या सेमिनार रूममध्ये (Seminar Room) सापडला होता. या घटनेच्या तीन महिन्यांनंतर, म्हणजेच 11 नोव्हेंबर रोजी, कोलकाता न्यायालयात (Kolkata Court) या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. (RG Kar Rape-Murder Case)
कोलकाता उच्च न्यायालयाच्या (Kolkata High Court) निर्देशानुसार, कोलकाता पोलिसांकडून (Kolkata Police) तपास काढून घेत सीबीआयकडे (CBI) सोपवण्यात आला होता. सीबीआयने (CBI) संजय रॉयसाठी (Sanjay Roy) “जास्तीत जास्त शिक्षेची” मागणी केली होती. या प्रकरणाचा खटला 9 जानेवारी रोजी संपला होता.
Title : RG Kar Rape-Murder Case Life Imprisonment for Sanjay Roy