मनोरंजन

सलमान आणि संजय दत्तचे वकील लढणार रियाची केस; एका दिवसाची फी ऐकून धक्का बसेल..

मुंबई | सुशांत सिंग राजपूत आत्महत्येच्या तपास वेगळ्या वळणावर जाऊन पोहचला आहे. मुंबई पोलिसांकडून आत्महत्या प्रकरणी बाॅलिवूडमधील बड्या दिग्गजांचा जबाब नोंदविला जात आहे. मात्र सुशांतचे वडील के. के. सिंग यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

सुशांतची प्रेयसी असलेल्या रियावर गंभीर आरोप करत त्याच्या वडीलांनी पटणा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला. यानंतर रियानं लागलीच अटकपूर्व जामिनासाठी आता धावाधाव सुरू केली आहे. यासाठी तीनं ख्यातनाम वकिल सतिश माने शिंदे यांच्याकडे आपली केस सोपविली आहे.

देशातील सर्वात महागड्या वकिलांमध्ये सतिश माने शिंदे या नावाचा समावेश होतो. माने यांनी याआधीदेखील सलमान खान काळवीट प्रकरण आणि संजय दत्तच्या बाॅम्बस्फोट प्रकरणाची केस यशस्वीपणे हाताळली होती. सतिश यांनी रियाची केस लढविण्याची पूर्ण तयारी केली असून मुंबई पोलिसांनीच या केसचा तपास करावा, असा विनंती अर्जही सर्वोच्च न्यायालयाला सोपविला आहे.

मात्र सतिश माने कोर्टात सादर होण्यासाठी एका दिवसाचे तब्बल 10 लाख रूपये फी आकारत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे हा दर 2010 सालचा असल्यानं आता सतिश यांच्या फीमध्ये देखील वाढ झालेली आहे. यामुळे रिया चक्रवर्तीनं आपल्या विरोधातील केस लढण्यासाठी शक्य तितका पैसा खर्च करण्याची तयारी केल्याचं समोर आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर माजी केंद्रिय मंत्री जयराम नरेश यांचा सवाल

पुण्यातील कर्वेनगरमध्ये नवरा-बायकोची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये दिलं ‘हे’ कारण

विवस्त्रावस्थेत आढळलेल्या पुण्यातील तरुणीच्या हत्येचं गूढ उकललं; पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या