बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गेंड्याच्या कातडीचे सरकार झाले आहे’; चंद्रकांत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई | एसटी विलिणीकरणाचा तिढा काही सुटताना दिसत नाही. विलिणीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी 2 महिन्यांपासून संपावर आहेत. त्यातचं उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी एसटीचं सरकारमध्ये विलनीकरण शक्य नाही, असं स्पष्ट केलं आहे. यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील (Chandrkant Patil) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

“एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिणीकरणात काय अडचण आहे? राज्याची तिजोरी कशासाठी आहे हे मला कळतंच नाही. देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी खूप काटेकोरपणे राज्य चालवलं होतं. त्यामुळे आपल्याला 15 कोटींच्या वर कर्ज घ्यावे लागणार नाही. शिवाय कोविडमध्ये मोदींनी पाच टक्के आणखी वाढवून दिले आहेत,” असं चंद्रकातं पाटील यावेळी म्हणाले आहेत.

“सभागृहामध्ये पगारवाढ देता येत नाही असे सांगितले. मग त्या तिजोरीचे करायचे काय? नाही देत जा असं म्हणून चालतं नाही. गेंड्याच्या कातडीचे सरकार झाले आहे. तुम्हाला लोकांनी निवडून दिले नाही तर गोळाबेरीज करून तुम्ही निवडून आले आहात. पैसे देऊन परिक्षा होणार असतील तर त्यातून काय होणार आागामी काळात?” असा घणाघातही पाटलांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी एसटीचं सरकारमध्ये विलनीकरण शक्य नसल्याचं सांगितलं आहे. सध्या विलनीकरणाचा मुद्दा उच्च न्यायलयाकडे आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने त्यासाठी एक समितीही स्थापन केली आहे. समितीने विलनीकरणाबाबत केेलेला अभ्यास उच्च न्यायलयात सादर केला जाईल. त्यानंतर उच्च न्यायालय विलनीकरणाचा निर्णय देणार आहे.

थोडक्यात बातम्या-

नवाब मलिकांच्या ट्विटला नितेश राणेंचं प्रत्युत्तर, फोटो शेअर करत म्हणाले…

माया इथंच संपत नाही! सुपेंकडे पुन्हा सापडलं ‘इतक्या’ लाखांचं घबाड

पंजाब सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांचं ‘इतक्या’ लाख रूपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार

‘एवढा स्टाफ काय करतो, काय झोपा काढतो काय’; अजित पवार संतापले

धक्कादायक! विधानभवनासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More