Top News मनोरंजन

सत्यमेव जयते!, एफआयआर दाखल झाल्यानंतर रिया चक्रवर्तीची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये मोठं वादंग माजलं आहे. सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात बिहार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रिया चक्रवर्ती हिने पहिल्यांदाच आपली बाजू मांडलीये.

आपली बाजू मांडण्यासाठी रियाने सोशल मिडीयावर एक व्हिडीयो पोस्ट केला आहे. या व्हिडीयोमध्ये रिया म्हणते, “माझा देवावर आणि आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, मला न्याय नक्कीच मिळेल. माझ्याबद्दल मीडियामध्ये अनेक विचित्र गोष्टी बोलल्या जातायत. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मी त्यावर बोलणार नाही. सत्याचा विजय होईल.”

 

 

सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरोधात तक्रार दाखल केली होती. यामध्ये रियाने सुशांतकडून पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, ईडीने सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे याप्रकरणाशी संबधित झालेल्या पैशांच्या व्यवहारांशी चौकशी ई़डीकडून केली जाणारे.

बिहार पोलिसांच्या सुशांत मृत्यूप्रकरणातील एफआयआरच्या आधारावर मनी लाँड्रिंगची केस दाखल करण्यात आली. गुरुवारी ईडीने याप्रकरणातील एफआयआर आणि इतर कागदपत्र बिहार पोलिसांकडे मागितले होते. त्याचप्रमाणे ईडीने रिया चक्रवर्ती कुटुंबाच्या दोन्ही कंपन्यांच्या बँक खात्यांची आणि सुशांतच्या बँक खात्यांची माहिती मागवून घेतली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्र्यांच्या पुणे दौऱ्यानंतर कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटलांचे पुणेरी शालजोडे!

भाजपला लगीनघाई झालीये पण बायकोच मिळेना, प्रकाश आंबेडकरांची टीका

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील गव्हाणे यांची नियुक्ती

महाविकास आघाडी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये तर पीडीपीसोबत तुमचं कोणतं नातं होतं?- रोहित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या