महाराष्ट्र मुंबई

लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण?; पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न

Loading...

मुंबई | कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी भारत सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन केला आहे. या लॉकडाउनमुळे लोकांना घरातच कैद व्हावं लागलं आहे. पण काही लोक गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा अन्य काही कामांसाठी रस्त्यांवर फिरताना दिसतात. तेव्हा मात्र पोलिसांकडून मारहाण केल्याचे प्रकार दिसून आले. यावर अभिनेत्री रिचा चड्डानेे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला आहे.

कोरोना विषाणूपासून वाचवण्यासाठी लोकांना मरेपर्यंत मारलं जात आहे. हे कसलं धोरण?, असं ट्विट करत  रिचा चड्ढाने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

पोलीस ओरडून, घाबरवून आणि वेळप्रसंगी लाठीचा प्रहार करुन लोकांना घरातच थांबण्यास सांगत आहेत. मात्र पोलिसांच्या या कार्यप्रणालीवर विरोधी पक्ष नेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पोलीस नागरिकांना बेदम मारत असल्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, शेकडो नेटकऱ्यांनी रिचा चड्ढाच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जण रिचाच्या मताशी सहमत आहे. तर काही जण विरोधात. मात्र विराधात असलेल्यांनी रिचावर देखील टीका केली आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

नागरिकांना पैशाची उणिव भासणार नाही- सीतारामन

आई-वडीलांना मरण्यासाठी सोडू शकत नाही; अक्षय कुमारकडून 25 कोटींची मदत

महत्वाच्या बातम्या-

डोंबिवलीत राजकीय कुटुंबाच्या लग्नात कोरोनाबाधित व्यक्ती; महापौरांसह नगरसेवकांनाही क्वारंटाईनचा सल्लाॉ

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ तारखेपासून होणार प्रक्षेपणॉ

सॅल्यूट… आभाळाएवढं मन असणाऱ्या टाटांची आणखी 1 हजार कोटींची मदत!

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या