Mukesh Ambani | रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत, ज्यांचं Net Worth 86.8 अब्ज डॉलर्स (USD) आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून, त्यांची तीन मुले – ईशा अंबानी (Isha Ambani), आकाश अंबानी (Akash Ambani) आणि अनंत अंबानी (Anant Ambani) देखील आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. लोकांमध्ये नेहमीच उत्सुकता असते की या तिघांमध्ये सर्वात जास्त श्रीमंत कोण आहे आणि कोणाचा पगार किती आहे. (Mukesh Ambani)
1. ईशा अंबानी:
ईशा अंबानी या मुकेश अंबानी यांच्या कन्या आहेत. त्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (Reliance Industries Limited) बोर्डात नॉन-एग्झिक्युटिव्ह डायरेक्टर (Non-Executive Director) म्हणून कार्यरत आहेत. यासोबतच, रिलायन्स रिटेल (Reliance Retail), रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि रिलायन्स फाउंडेशनच्या (Reliance Foundation) एग्झिक्युटिव्ह लीडरशिप टीमच्या त्या प्रमुख सदस्या आहेत. ईशा अंबानी टीरा ब्युटीच्या (Tira Beauty) एग्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि को-फाउंडर देखील आहेत. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईशा अंबानींचं वार्षिक उत्पन्न (Annual income) सुमारे 4.2 कोटी रुपये आहे, आणि त्यांची एकूण संपत्ती (Net worth) अंदाजे 800 कोटी रुपये आहे.
2. आकाश अंबानी:
आकाश अंबानी हे मुकेश अंबानी यांचे मोठे पुत्र असून ते रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे (Reliance Jio Infocomm Limited) चेअरमन (Chairman) आहेत. याव्यतिरिक्त, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या (Reliance Retail Ventures Limited) संचालक मंडळावरही ते कार्यरत आहेत. आकाश अंबानी यांचा वार्षिक पगार (Annual income) सुमारे 5.6 कोटी रुपये आहे, आणि त्यांची एकूण संपत्ती (Net worth) 40.1 अब्ज डॉलर्स (USD), म्हणजेच सुमारे 3,32,815 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
3. अनंत अंबानी:
अनंत अंबानी हे मुकेश अंबानी यांचे सर्वात लहान पुत्र आहेत. ते रिलायन्स जिओमध्ये ऊर्जा (Energy) आणि दूरसंचार (Telecommunications) क्षेत्रांचे कामकाज पाहतात. तसेच, जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड (Jio Platforms Limited) आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या (Reliance Retail Ventures Limited) बोर्डवर ते डायरेक्टर (Director) म्हणून कार्यरत आहेत. अनंत अंबानी यांना वार्षिक 4.2 कोटी रुपये पगार मिळतो, आणि त्यांची एकूण संपत्ती (Net worth) 40 अब्ज डॉलर्स (USD) म्हणजेच सुमारे 3,32,482 कोटी रुपये आहे.
सर्वात श्रीमंत कोण?
मुकेश अंबानी यांच्या तीन मुलांमध्ये आकाश अंबानी हे सर्वात श्रीमंत आहेत, ज्यांची एकूण संपत्ती 40.1 अब्ज डॉलर्स आहे. अनंत अंबानी 40 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत, तर ईशा अंबानी 800 कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) वेळोवेळी आपल्या मुलांना त्यांच्या व्यावसायिक वाटचालीत मार्गदर्शन आणि मदत करत असतात.
Title : Richest children of Mukesh Ambani