बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रिक्षातून कुत्र्याला लाथ मारण्याचा प्रयत्न, चालकासोबत घडला खतरनाक प्रकार, पाहा व्हिडीओ

पुणे | रस्त्याने जाताना अनेकांना कुठे दगड मार किंवा एखाद्या भटक्या कुत्र्याला जाता जाता लाथ मार, अशी सवय असते. मात्र या सवयी किंवा असं करणं किती अंगलट येऊ शकतं याचा अनुभव पुण्यातील एका रिक्षा चालकाला आहे. भरधाव वेगात रिक्षा चालवत असताना रस्त्यात एक कुत्रं होतं त्याला लाथ मारून बाजूला करण्याच्या नादात रिक्षाचालकाचा अपघात झाला.

पिंपरी शहरातील शगुण चौकात हा चित्र-विचित्र अपघात घडल्याची माहिती समजत आहे. शगुण चौकातून दुपारच्या वेळी रिक्षा चालक जात होता. रस्त्यात त्याला कुत्रा दिसला आणि त्याने त्याला लाथ मारण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये त्याचा रिक्षावरचा ताबा सुटला. ताबा सुटल्यावर रिक्षा बाजूच्या दुभाजकावर जोरात आदळली, रिक्षा आदळली तेव्हा त्या धक्क्यात रिक्षा चालकही रिक्षातून बाहेर पडला.

रिक्षा चालक पडला मात्र रिक्षा चालकाविनाच पुढे जात राहिली. त्यावेळी आजुबाजूच्या लोकांनी रिक्षाला पकडत रिक्षा थांबवली, रिक्षा थांबवली खरी पण रिक्षाने चालकाविना बराच अंतर पार केलं. रिक्षा पलीकडच्या बाजूने जात होती तेव्हा समोरून एक चारचाकी गाडी येत होती. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे रस्तेही मोकळे आहेत त्यामुळे वाहन भरधाव वेगाने चालवणं चुकीचं आहे. रिक्षा चालकच नाही इतर कोणीही कधी असा काही प्रकार करू नये. तुम्हाला कुत्रा दिसलाच तर तुम्ही तुमच्या गाडीचं वेग कमी करून त्याला हुसकू शकता. या अपघातात रिक्षा चालकाचं नशीब चांगलं म्हणून त्याला काही गंभीर दुखापत झाली नाही.

 

थोडक्यात बातम्या- 

कोरोनाचे नियम धाब्यावर; पुण्यात सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला मोठी बाईक रॅली

दिलासादायक बातमी! पुण्यात आज नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त!

मन सुन्न करणारी घटना; बापाने मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन पायी चालत स्मशानात नेला, पाहा व्हिडीओ

गोपीनाथ मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला- पंकजा मुंडे

हृदयद्रावक घटना! 25 दिवसांपूर्वी आई झालेल्या डॉक्टरचा कोरोनानं मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More