बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्य शासनाच्या जाचक अटीमुळे 2 महिन्यांपासून 1500 रुपये मिळवण्यासाठी रिक्षाचालकांची धावपळ

सांगली | महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात लाॅकडाऊन लावण्यापूर्वी रिक्षाचालकांना व इतर कामगारांना 1500 रुपये आर्थिक मदत देणार असल्याचं घोषित केलं होतं. परंतु, प्रत्यक्षात मात्र ही मदत मिळवण्यासाठी लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात कसरत होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, सांगली जिल्ह्यामध्ये दोन महिन्यांपासून रिक्षा चालक ही मदत मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. पण लाॅकडाऊन उलटून दोन महीने झाली तरीही अद्याप राज्य शासनाने घोषित केलेले 1500 रुपये राज्य शासनाच्या जाचक अटींमुळे रिक्षाचालकांना मिळाले नसल्याने त्यांच्यामधून नाराजीचा सूर उमटत आहे.

सांगली जिल्ह्यात एकूण 10 हजार रिक्षाचालक असून त्यापैकी 9 हजार 500 च्या जवळपास रिक्षाचालक हे परवानाधारक आहेत. तसेच बहुतांश रिक्षाचालक हे सुशिक्षित नसल्यामुळे आणि तंत्रज्ञान अवगत नसल्यामुळे त्यांना शासनाच्या घालून दिलेल्या नियमांची पूर्तता करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रातील बर्‍याचशा रिक्षावर बँकांचे कर्ज आहे. त्यामुळे मूळ कागदपत्रे ही बँकेत जमा असल्याने त्या कागदपत्रांची पूर्तता करणे रिक्षाचालकांना शक्य होत नाही. तसेच बँकेकडे याबाबत विचारणा केली असता आधी कर्जाची परतफेड पूर्णपणे करा, मगच कागदपत्रं मिळतील, असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे रिक्षा चालकांची मोठ्या प्रमाणात परवड होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याबरोबरच रिक्षाचालकांना सरसकट मदत मिळावी, अशी रिक्षाचालक संघटनांची मागणी देखील जोर धरू लागली आहे. राज्य सरकार नेमका यावर काय मार्ग काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

थोडक्यात बातम्या –

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटीत ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

जेव्हा छगन भुजबळ फडणवीसांना फोन करून म्हणतात, ‘आम्हाला मदत करा,आम्ही…’

सकारात्मक बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 1 लाखांच्या खाली

जात पंचायतीचा जाच संपणार कधी?; बहिष्कार टाकल्यानं 7 बहिणींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला खांदा

मुळशीतील रासायनिक कंपनीत पुन्हा एकदा आगीचा थरार; आज सकाळी पुन्हा आग भडकली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More