बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील रिक्षा प्रवास महागणार; असे असणार नवे दर

पुणे | पुण्यातील रिक्षा प्रवास आता महागणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे महागाई आणि इंधन दरवाढीला त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांचा पुण्यातील रिक्षा प्रवासही महागणार आहे. सध्या पुण्यात मिटरप्रमाणे दीड किमीच्या पहिल्या टप्प्यासाठी 18 रूपये दर आकारला जातो. त्यानंतरचे प्रति किमी 12 रुपये 31 पैसे घेतले जातात.

प्रादेशिक परिवहन विभागाची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये रिक्षा भाड्यांमध्ये वाढ करण्याचा प्राथमिक निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अंतिम निर्णय हा येत्या दोन दिवसात घेतला जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. नवीन भाड्यानुसार आता पहिल्या टप्प्यासाठी 18 रुपयांऐवजी 21 रूपये मोजावे लागणार आहे.

पहिल्या दीड किमीच्या टप्प्यासाठी 3 रूपये वाढ होणार आहे. तसेच त्या पुढच्या प्रत्येक किमीसाठी 14 रूपये 60 पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आता पुणेकरांचा रिक्षाप्रवास महागणार असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान सध्या मोठ्या प्रमाणात इंधनांच्या दरांनी उच्चांक गाठला असताना सर्वच गोष्टींच्या दरात हळूहळू वाढ होत आहे.

2015 साली शेवटची रिक्षा भाडेवाढ करण्यात आली होती. त्यानंतर कोरोना संकटात रिक्षाच्या भाडेवाढीचा मुद्दा भिजत पडला होता. त्यातच आता पुण्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला 13 रिक्षा चालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच त्यांनी भाडेवाढीचा मुद्दाही चांगलाच लावून धरला होता.

थोडक्यात बातम्या

सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईतुन मोठा दिलासा; वाचा सविस्तर वृत्त

“भाजपसारख्या हिंदुत्ववादाची गाजरपुंगी वाजवणाऱ्या पक्षास ही गोष्ट शोभत नाही”

“विराटच्या नेतृत्त्वाखाली खेळण्यास मिळणं हे ‘भाग्य’ आहे”

“पंतप्रधान मोदींच्या विरोधात आघाडी सरकारमधील तीनही पक्ष बदनामीचा कट रचतायेत”

…म्हणून देशात जाणवतोय कोळशाचा तुटवडा, केंद्रानं दिलं उत्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More