बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चहलच्या बायकोने इन्स्टावरुन हटवलं आडनाव; घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

मुंबई | भारतीय क्रिकेट संघातील लोकप्रिय क्रिकेटर युजवेंद्र चहल आपल्या खासगी आयुष्यात अनेकदा चर्चेत असतो. चहल आणि त्याची पत्नी धनश्री देखील सोशल मिडीयावर अॅक्टिव दिसतात. हे दोघे लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत.

या दोघांचे मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. पण त्यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरवणारी बातमी आहे. चहल आणि धनश्रीमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू आहे. धनश्रीने इन्स्टाग्रामवरून चहल हे आडनाव काढून टाकलं आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याआधी धनश्री वर्मा-चहल असं नाव लावत होती. आता तिने हे नाव काढलंय. या गोष्टीमुळे चहल आणि धनश्री यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, चहलने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने लिहिलं आहे की, ‘नव्या आयुष्याची सुरूवात होत आहे.’ यामुळे सर्व चाहते चकीत झाले आहेत.

थोडक्यात बातम्या –

‘उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामधील अजितदादांचं राज्य’; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

महागाईने ग्रासलेल्या जनतेला वीज दरवाढीचा शॉक बसणार!

“आज सगळ्यावर जीएसटी आहे, फक्त भाषणावर जीएसटी नाही”

मोठी बातमी! महागाईने त्रस्त नागरिकांना आणखी एक झटका

‘शरद पवारांना भेटा, त्यांनी आपल्यापेक्षा…’; अजित पवारांनी अब्दुल सत्तारांना दिला सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More