Rinku Rajguru | ‘सैराट’ या चित्रपटानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरू हीचं आयुष्य बदलून गेलं. या चित्रपटात तिने ‘आर्ची’ ची भूमिका साकारली होती. यानंतर ती अनेक चित्रपटात झळकली. आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनावर चांगलीच छाप सोडली. अभिनेत्रीच्या सौंदर्याचे देखील अनेक चाहते आहेत. तिच्या एका अदाने चाहते घायाळ होतात. अशात रिंकू राजगुरू(Rinku Rajguru) एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे.
एका मुलाखतीदरम्यान तिने वाचून दाखवलेल्या कवितेमुळे ती चर्चेत आली आहे. तिच्या कवितेमुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. रिंकुने नुकतीच एका पॉडकास्टला मुलाखत दिली. यावेळी तिने बालपण, शाळा, घर, आई-वडिल यांच्याबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या.
तुझे फार मित्र-मैत्रीणी नाहीत, मग तू लिहितेस का? या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली की, मी आधी लिहायचे. काही दिवसांपूर्वी लिहणं बंद केलं. तू लिहिलेलं काही वाचून दाखवू शकतेस का? यावर रिंकूने ‘कमरा’ नावाची एक कविता वाचून दाखविली.
View this post on Instagram
रिंकूने वाचली स्वतः लिहिलेली कविता-
“जब वो नहीं होता है, तब वह खाली कमरा बहुत कुछ कहता है, शायद उसके ना होने की एक वजह होगी की उसे मै महसूस करूँ, अपने अंदर झाक कर देखू तो वहीं होता हैं, मेरे भीतर सिर्फ किसी और के साथ, उसने शायद खो दिया मुझे अब, लेकीन मैं अभी भी खुद को पाती हूँ उसके साथ, उसकी झूठी दुनिया में, उसकी झूठी दुनिया में खुदको पाना, क्या सच्चाई हैं मेरी? आज भी उस खाली कमरो को देख के उसको महसूस करना, क्या अच्छाई है मेरी?”, अशी कविता रिंकूने (Rinku Rajguru) काही वर्षांपुर्वी लिहिल्याचे सांगितले.
यावेळी रिंकूला तिच्या मित्र-मैत्रिणींबद्दल देखील प्रश्न करण्यात आला. तू अकलूजला गेल्यावर मित्र-मैत्रीणींबरोबर फिरायला जातेस का? त्यांच्याबरोबर वेळ घालवतेस का?, असा प्रश्न अभिनेत्रीला करण्यात आला. यावर रिंकूने आपल्या शाळेतल्या काही आठवणी सांगितल्या.
रिंकूने जागवल्या ‘त्या’ आठवणी
“मला फार मित्र मैत्रीणी नाहीत. कारण चौथीनंतर ज्या शाळेत मी गेले ती मुलींची शाळा होती. तिथे ओळखीच्या म्हणू शकू, अशा 2-3 काही मैत्रीणी झाल्या. पण मी जिला जवळची मैत्रीण म्हणायचे, ते पुढे समजलं की आपण त्यांना बेस्ट फ्रेंड म्हूणू शकत नाही. मला असं जाणवलं की स्वार्थासाठी मैत्री होतेय. मला तशी मैत्री आवडत नाही. एखाद्याशी मैत्री केली मी पुढच्या व्यक्तीला खूप जवळचे मानते. त्यामुळे मैत्री करताना मी विचार करते.”, असं रिंकु (Rinku Rajguru) म्हणाली.
News Title- Rinku Rajguru read her own written poetry
महत्वाच्या बातम्या-
गौतम अदानींसाठी सुजय विखे झाले ड्रायव्हर, व्हिडीओ व्हायरल
एफडीसाठी चांगली संधी! सर्व बँका देतायेत भरघोस व्याज; जाणून घ्या किती?
मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला?, उद्धव ठाकरेंनी केली मोठी घोषणा
क्रिकेटप्रेमींनो लवकरच रंगणार दुलीप ट्रॉफी स्पर्धा! BCCI ने निवडले चार नवे कर्णधार
महत्वाची बातमी! ‘या’ दिवशी सर्व दवाखाने राहणार बंद; इमर्जन्सी असल्यास काय?