Top News महाराष्ट्र मुंबई

जात महत्वाची नसून अन्यायाविरुद्ध लढणं महत्वाचं- रिंकू राजगुरू

Photo Credit- Facebook/ Rinku Rajguru

मुंबई | राज्यात 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची तयारी मोठ्या थाटामाटात साजरी झाली. कोरोनामुळे सरकारने निर्बंध लावले होते मात्र अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या शिवाजी महाराजांची जयंती शिवभक्तांनी जयंती साजरी करत आपल्या राजाला मानवंदना दिली. शिवजंयतीदिवशी अभिनेते आणि दिग्गजांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महाराजांना अभिवादन केलं. प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरूनेही एक खास पोस्ट केली होती. तिची ही पोस्ट माध्यमांवर व्हायरल झाली आहे.

छत्रपती शिवराय हे नावच सर्वसमावेशक आहे. जात महत्वाची नसून अन्यायाविरुद्ध लढणं महत्वाचे आहे. स्वार्थासाठी नव्हे तर स्वराज्यासाठी लढणं महत्वाचं आहे. राजा माझा सुखकर्ता, असं रिंकू राजगुरूने केलेल्या पोस्टला कॅप्शन दिलं आहे. रिंकूने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. रिंकूची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

रिंकूने केलेल्या पोस्टमध्ये आपला फोटो शेअर केला आहे. मराठमोठ्या लूकमधला फोटो तिने टाकला आहे. या फोटोत तिने जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स केले आहेत. तर मोठ्या प्रमाणात कमेंट्सही या फोटोवर आल्या आहेत.

दरम्यान, ‘सैराट’ या चित्रपटातून रिंकू घराघरात पोहोचली. चित्रपटात तिने साकरलेल्या पात्राचं नाव आर्ची असं होतं. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता आकाश ठोसर मुख्य भूमिकेत होता. पर्श्या आणि आर्चीची जोडी आजही अतिशय लोकप्रिय  असून त्या चित्रपटातील गाण्यावर आजही लोक थिरकताना दिसतात.

 

थोडक्यात बातम्या-

पेट्रोल, डिझेल दरवाढीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या…

“शिवाजी महाराज होणे शक्य नाही पण सव्वाशे कोटी देशवासी ‘सेवाजी’ बनू शकतात”

गुंड गजा मारणे फरार, पोलिसांची पथकं घेत आहेत शोध

पुण्यात पुन्हा गुंडांची दहशत, तरुणावर झालेला हल्ला सीसीटीव्हीत कैद, पाहा व्हिडीओ

राज्यात नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता, मंत्रिमंडळातील ‘या’ नेत्याने दिले संकेत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या