बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महिन्याभरात सीएनजी गॅसचे दर दुसऱ्यांदा भडकले, जाणून घ्या नवे दर

नवी दिल्ली | देशात महागाई दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ कायम असतानाच सीएनजी गॅसचे दर पुन्हा भडकले आहेत. सीएनजी गॅसच्या दरात ऑक्टोबर महिन्यात झालेली ही दुसरी वाढ आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने राजधानी दिल्लीसह अनेक शहरात सीएनजीच्या किंमतीत वाढ जाहीर केली आहे. सीएनजी गॅसचे वाढलेले नवे दर बुधवारपासून लागू होणार आहेत.

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने सीएनजी गॅसच्या किंमतीत 2.28 रूपये प्रति किलोने वाढ जाहीर केली आहे. मुंबई आणि उपनगरात आता सीएनजीचा दर 54.57 रूपये प्रतिकिलो इतका आहे. तर राजधानी दिल्लीत सीएनजी गॅसची किंमत वाढून 49.76 रुपये प्रतिकिलो इतकी झाली आहे. 12 दिवसांतच सीएनच्या गॅसचे दर दुसऱ्यांदा वाढले आहेत.

सीएनजी गॅसचे दर वाढून गुरूग्राममध्ये 58.20 रूपये प्रतिकिलो, नोएडामध्ये 56.02 रूपये प्रतिकिलो तर मेरठ, मुझफ्फरनगर आणि शामलीमध्ये 63.28 रूपये प्रतिकिलो झाले आहेत.सीएनजीची रेवाडीमध्ये 58.90 रूपये किलो, कैथलमध्ये 57.10 रूपये किलो, फतेहपूर आणि हमीरपूर 66.54 रुपये किलो तर अजमेर, पाली आणि राजसमंदमध्ये 65.02 रूपये प्रतिकिलो किंमत असणार आहे.

नॅच्युरल गॅसच्या किंमतीत यापुर्वी 62 टक्के वाढ करण्यात आली होती. तेव्हाच सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या दरात वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार आता सीएनजीच्या किंमती वाढल्या आहेत. यासोबतच घरात वापरल्या जाणाऱ्या पीएनजी गॅसच्या दरात देखील वाढ जाहीर करण्यात आली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“पंतप्रधान मोदींच्या विरोधात आघाडी सरकारमधील तीनही पक्ष बदनामीचा कट रचतायेत”

…म्हणून देशात जाणवतोय कोळशाचा तुटवडा, केंद्रानं दिलं उत्तर

‘हे कृत्य राक्षसी’; पुण्यातील घटनेवर अजित पवार संतापले

पुण्यातील ‘त्या’ क्रुर घटनेवरून चित्रा वाघांना संताप अनावर, म्हणाल्या…

महाविकास आघाडीतील धुसफुस पुन्हा चव्हाट्यावर, वडेट्टीवार ‘या’ कारणामुळे नाराज

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More