बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; एलपीजी गॅसच्या किंमतीत पुन्हा वाढ

नवी दिल्ली | सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा फटका बसणार आहे. कारण घरगुती गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडर आणि कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे.

घरगुती गॅस सिलेंडर तब्बल 25.50 रुपयांनी महागला आहे. तर कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत 84 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याचं दिवशी गॅस सिलेंडरच्या दरात मोठे बदल करण्यात आले आहेत.

घरगुती गॅसच्या किमतीत यावर्षी 2021 मध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. दिल्लीत आता घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा दर 809 रुपयांवरुन 834.50 रुपये झाला आहे. देशातील विविध शहरांत आज 1 जुलैपासून नव्या किमती लागू झाल्या आहेत.

जानेवारी सोडून इतर जवळपास सर्व महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. 4 फेब्रुवारी रोजी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ केली होती. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींनी जनता हैराण असताना आता सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी जनतेला आणखी एक बसला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“केंद्राला काय करायचं ते करूद्या, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही”

सीताच्या भूमिकेसाठी करीनाने मागितलं होतं ‘इंके’ मानधन, तापसीनं केली बेबोची पाठराखण

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं! तरूण शेतकऱ्याने टाकाऊ वस्तूंपासून बनवलं पेरणी यंत्र

‘मी 10 हजारांची फौज घेऊन येईन, एका फटक्यात सरळ करेन’; शिवसेना आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

“संभाजी भिडे महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत, त्यांच्यावर सरकारने गुन्हा दाखल करावा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More