बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अरे मारतो का आता! अन् थोडक्यात बचावला दिनेश कार्तिक, पाहा व्हिडीओ

 मुंबई | जगातील सर्वात प्रसद्ध लीग असलेल्या आयपीएलमधील अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहिले आहेत. यामध्ये कधी एखाद्या फलंदाजाने केलेली खरतनाक गोलंदाजी असो वा मग फलंदाजाने केलेली आक्रमक खेळी. अशाच प्रकारे ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिकचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यातील हा व्हिडीओ आहे. त्यामध्ये दिसत आहे की पंत फलंदाजी करत असतो त्यावेळी कोलकाताचा गोलंदाच वरूण चक्रवर्तीचा चेंडू मारताना पंतच्या बॅटला तो चेंडू लागतो आणि तिथेच जाग्यावर उंच उडतो तेव्हा कॅच घेण्यासाठी कार्तिक पुढे येतो. मात्र त्यावेळी पंतने बॅट मागे वळवली.

कार्तिकला जर ती बॅट लागली असती तर त्याला मोठी दुखापत झाली असती. मात्र काही वेळातच पंतने कार्तिकची माफी मागितली होती. अतरंगी स्वभावामुळे पंत कायम चर्चेत असतो. तो सतत मैदानावर काहीना काही करत असतो.

दरम्यान, चालू सामन्यानध्ये कीपर असताना स्टंपच्या मागून बोलत राहणे, यासाठीही तो ओळखला जातो. पंतकडे दिल्लीचं कर्णधारपद आहे, त्याच्या नेतृत्त्वाखाली संघ चांगली कामगिरी करत आहे. यंदाही दिल्ली कॅपिटल्स अंतिम चारमध्ये आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

“मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांचं नागरिकत्व काढून भारताला ‘हिंदू राष्ट्र’ म्हणून घोषित करा”

वाहह! आता सुईशिवाय दिली जाणार लस, कसं ते जाणून घ्या

“गोव्याचे राजकीय डबके करणारे आजचे राजकारणी पोर्तुगीज सत्तेचेच वारसदार”

पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांकडून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश!

IPLच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी दोन सामने, बीसीसीआयचा मोठा निर्णय!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More