बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऋषभ पंतने माहीचा हा विक्रम मोडत झाला नंबर वन यष्टीरक्षक

मुंबई | भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडत एक नंबरचा यष्टीरक्षक ठरला आहे. पंतने सर्वात कमी डावात 1000 धावांचा टप्पा पार केला आहे.

भारतीय यष्टीरक्षकांमध्ये आधी हा विक्रम धोनीच्या नावावर होता. धोनीने 32 डावात 1000 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या स्थानी फारूख इंजिनीअर यांनी 36 डावात तर तिसऱ्या स्थानी वृद्धीमान साहाने 37 डाव खेळले होते.

ऋषभ पंतने अवघ्या 27 डावातच 1000 धावा पुर्ण केल्या आहेत. सध्या चालू असलेल्या कसोटीत पंत खेळत असून भारताला 122 धावांची गरज आहे.

दरम्यान, पंतसोबत चेतेश्वर पुजारा खेळत आहे. भारताला कसोटी जिंकण्यासाठी 122 धावा करायच्या आहेत आणि ऑस्ट्रलियाला 7 विकेट्सची गरज आहे.

थोडक्यात बातम्या-

ग्रामपंचायत निवडणुकीत कोणता पक्ष मोठा?; फायनल आकडे आले समोर

भारतातील ‘या’ प्रदेशात पहिल्यांदाच आढळला कोरोनाचा रुग्ण

ग्रामपंचायत निवडणुकीत मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“ईडी, सीबीआयच्या ‘कार्यकर्त्यां’ना हाताशी धरून महाराष्ट्रात राजकीय क्रांती घडविता येणार नाही”

…तर कोव्हॅक्सिन टोचून घेऊ नका; भारत बायोटेकनेच दिला गंभीर इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More