भर मैदानात ऋषभ पंत पंचासोबत भिडला; नेमकं काय घडलं?

Rishabh Pant DRS Controversy l ऋषभ पंतची गणना अत्यंत शांत क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. पंत अनेकदा मैदानावर हसताना दिसतो. मात्र, लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात पंतची वेगळी बाजू पाहायला मिळाली आहे. डीआरएसबाबत दिल्लीच्या कर्णधाराने पंचांशी वाद घातला आहे. पंत आणि पंच यांच्यात बराच वेळ वाद झाला, पण ऋषभ स्वतःची चूक मान्य करायला तयार नव्हता. तर सामन्या दरम्यान नेमकं काय घडलं होत ते पाहुयात

Rishabh Pant DRS Controversy l ऋषभ पंतने DRS वरून पंचासोबत घातला वाद :

दिल्ली आणि लखनौ या सामन्यात ऋषभ पंतने DRS वरून पंचासोबत वाद घातला आहे. यावेळी इशांत शर्माने ओव्हरचा चौथा चेंडू बाहेर टाकला, जो अंपायरने वाईड बॉल म्हणून घोषित केला. पंचांच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी ऋषभ पंत आपल्या खेळाडूंशी बोलताना दिसला. यावेळी पंतने डीआरएस घ्यायचे असल्याचे संकेत दिले. पंतचे दोन्ही हात पाहून तो डीआरएस घेण्याचे संकेत देत असल्याचे दिसत होते.

पंतच्या हाताचे हावभाव पाहून मैदानावरील पंचांनी निर्णय तिसऱ्या पंचाकडे पाठवला. रिप्लेमध्ये, चेंडू रेषेच्या बाहेर जाताना स्पष्टपणे दिसत होता आणि त्यामुळे दिल्लीने कोणतेही कारण नसताना रिव्ह्यू गमावला. तिसऱ्या पंचाचा निर्णय येताच पंत पंचांकडे गेला.

दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराने पंचांसमोर स्पष्टीकरण दिले की त्याने क्षेत्ररक्षकाकडे हाताने इशारा केला होता आणि डीआरएस घेऊ नये. या प्रकरणावर पंत बराच वेळ पंचांशी वाद घालतानाही दिसला. पंतने डीआरएस घेण्याचे संकेत दिल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत असतानाही पंत आपली चूक मान्य करण्यास तयार नव्हता.

या सामन्यात कुलदीपची दाखवली जादू :

लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवची जादू शिगेला पोहोचली होती. कुलदीपने चार षटकात केवळ 20 धावा देत 33 बळी घेतले. कुलदीपने त्याच षटकात मार्कस स्टॉइनिस आणि निकोलस पूरन यांना बाद केले. कुलदीपने पूरनला क्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.

अशातच आता फ्रेजर मॅकगर्क त्याच्या आयपीएल पदार्पणामुळे चर्चेत आला आहे. लखनौविरुद्ध खेळताना त्याने अर्धशतक झळकावले आहे. आपल्या स्फोटक खेळीसाठी प्रसिद्ध असलेल्या फ्रेझरने दिल्लीकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले, ज्यामध्ये त्याने 35 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. तो दिल्लीसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून पदार्पण करणारा फ्रेझर मॅकगर्क हा आंतरराष्ट्रीय लीग टी20 मध्ये दुबई कॅपिटल्सचा भाग आहे.

News Title : Rishabh Pant DRS Controversy

महत्त्वाच्या बातम्या : 

राजस्थानचे शिलेदार पंजाबचा धुव्वा उडवण्यास सज्ज; आज रंगणार PBKS vs RR सामना

या राशीच्या व्यक्तीने फसवणुकीपासून सावध राहावे

दिनेश कार्तिकची बॅटिंग पाहून भरमैदानात रोहित म्हणाला असं काही की…, व्हिडीओ व्हायरल

सांगलीत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, उचललं मोठं पाऊल

आरसीबी विरुद्ध विकेट्सचा ‘पंच’, बूमराहने पटकावली पर्पल कॅप