बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“रिषभ पंत असाच खेळत राहिला तर एक दिवस धोनीलाही मागे टाकेल”

नवी दिल्ली | भारताचा स्टार फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंतने इंग्लंड विरूद्धच्या मालिकेत मोलाची कामगिरी केली होती. भारतीय संघाला त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे इंग्लंड विरूद्धची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकता आली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आणि आता इंग्लंड विरूद्ध केलेल्या कामगिरीमुळे पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने रिषभ पंतची तोंडभरून प्रशंसा केली आहे.

तो ज्या प्रकारे स्वतःला व्यक्त करतो. त्याच्याकडे ज्या प्रकारचे त्याचे शाॅट्स आहेत, असे मी गेल्या 30-35 वर्षात दोनच यष्टीरक्षक फलंदाज पाहिले आहेत. एक म्हणजे एम.एस. धोनी आणि दुसरा म्हणजे एडम गिलख्रिस्त. हे दोन यष्टीरक्षक फलंदाज सामना बदलून टाकायचे. रिषभ जर असाच खेळत राहिला तर तो या दोघांनाही मागे टाकेल, असा विश्वास पाकिस्तानचा खेळाडू इंजमाम उल हक याने दाखवला आहे.

रिषभ पंतने भारतासाठी लोवर ऑर्डरमध्ये महत्वाची भुमिका बजावली आहे. त्याने 40 चेंडूत 77 धावांची खेळी केली होती. त्यामुळेच भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. मी त्याला गेल्या 6-7 महिन्यांपासून फाॅलो करत आहे. ज्याप्रकारे तो वेगवेगळ्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करतो ते अप्रतिम आहे, असं इंजमाम पुढे म्हणाला.

दरम्यान, रिषभ पंतने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोलाची कामगिरी केली होती. फक्त फलंदाजीतच नव्हे तर यष्टीरक्षण करताना देखील त्याने अप्रतिम झेल पकडले होते. तर इंग्लंड विरूद्धच्या मालिकेत 2 सामने खेळण्याची संधी त्याला मिळाली. त्याचं देखील त्यानं सोनं केलं होतं. तर शेवटच्या सामन्यात पंतने 62 चेंडूत 78 धावांची आवश्यक खेळी केली होती.

थोडक्यात बातम्या –

महाराष्ट्रात कोणासोबत सरकार बनवणार… अमित शहांच्या नव्या वक्तव्याने मोठी खळबळ

अल्पवयीन बालिकेचा विवाह रोखण्यात यश ; मंत्री यशोमती ठाकूर यांची धडक कारवाई

शेतकऱ्यांचा संताप अनावर; भररस्यात भाजप आमदाराचे कपडे फाडून केली मारहाण

धक्कादायक! भाजप नगरसेविकेच्या मुलाने पिस्तुलाने स्वत:वर झाडून घेतली गोळी

सावधान!!! महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार; आज तब्बल एवढ्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More