बचके रहना रे बाबा!; रिषभ पंत नेटमध्ये करतोय जोरदार फटकेबाजी, पाहा व्हिडीओ
मुंबई | उद्यापासून जगातली सर्वात प्रसिद्ध लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगची सुरवात होत आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. तर त्यांनतर 10 तारखेला गतवर्षीचा रनर अप संघ दिल्ली कॅपिटल्सचा सामना धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स यांच्याशी होणार आहे. तर त्याआधी दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने नेटमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीचा जलवा दाखवला आहे.
दिल्ली कॅपिटल्सने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत नेट्समध्ये जोरदार तयारी करताना दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ सध्या मुंबईत आहे. मुंबईत येत्या 10 तारखेला दिल्ली आणि चेन्नई यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघ या हंगामातील पहिला विजय मिळवण्यासाठी उत्सुक असतील.
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या अखेरच्या एकदिवसीय मालिकेत श्रेयस अय्यर याच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो चालू आयपीएल हंगाम खेळणार नाही यावर शिक्कामोर्तब झालं. त्यानंतर संघातील अजिंक्य रहाणे या अनुभवी खेळाडूला वगळता दिल्लीच्या व्यवस्थापकांनी रिषभ पंतकडे कर्णधारपद सोपवलं आहे.
दरम्यान, दिल्लीच्या संघात रिषभ पंत, पृथ्वी शॉ, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, मार्कस स्टोनिस, शिमरन हेटमायर, अक्षर पटेल, अँरीच नोर्जे , अमित मिश्रा, आर अश्विन, कबिसो रबाडा यांसारख्या खेळाडूंची मोठी फळी आहे. त्यामुळे या आयपीएल हंगामात दिल्लीचा संघ चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.
पाहा व्हिडीओ-
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या-
उदयनराजे म्हणतात, ‘सध्या राज्यात काय राजकारण चाललंय हे मलाच कळेना’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस
“टक्का कुणाला ‘धक्का’ देणार, कुणाची नाव ‘धक्क्या’ला लावणार?”
“…तरच 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार”
‘ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील’; चित्रा वाघ यांचं रूपाली चाकणकरांना प्रत्युत्तर
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.