बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् रिषभ पंतने प्रशिक्षकालाच गोल गोल फिरवलं, पाहा व्हिडीओ

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रिषभ पंत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर त्यानं भारतीय संघात स्थान मिळवलं आहे. काही वर्षातच त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव गाजवलं आहे. त्याची जगभरातून स्तुती होत असते. आता पुन्हा रिषभ एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

सोशल मीडियावर रिषभ पंतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात तो जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे. त्यानंतर रिषभ भारतीय संघातील परफॉर्मर एनालिस्ट हरीप्रसाद मोहन यांच्याकडे जातो. त्यानंतर तो त्यांना उचलतो आणि गोल गोल फिरवतो. 3 वेळा त्यांने हरीप्रसाद यांना फिरवलं. त्यानंतर त्यांना हळूच खाली ठेवलं.

रिषभ पंत नेहमी संघातील प्रशिक्षक आणि खेळाडूंसोबत मस्ती कराताना दिसत असतो. पंतने देखील त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम करताना दिसत आहे. भारतीय क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची तयारी करत आहे.

दरम्यान, रिषभ पंत भारतीय संघासाठी महत्वाचा खेळाडू आहे. आगामी कसोटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रिषभवर महत्वाची जबाबदारी असणार आहे. त्याने इंग्लंड विरूद्धच्या कसोटी सामन्यात संयमी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

‘दहावीची परीक्षा घेण्याचा आग्रह धरु नका, अन्यथा…’; याचिकाकर्त्याला जीवे मारण्याची धमकी

आत्तापर्यंत लेकीचा चेहरा का दाखवला नाही?; चाहत्याच्या प्रश्नावर विराटने दिलं ‘हे’ उत्तर

अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचं कोरोनामुळे निधन!

फक्त ‘या’ कारणासाठी सलमानसोबत काम केलं; प्रवीण तरडेंनी सांगितलं आश्चर्यजनक कारण

मन सुन्न करणारी घटना; बहिणीच्या दशक्रियेदिवशीच भावाचाही कोरोनाने मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More