बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘रोहितने केलेल्या चूका तू करु नको’; भारताच्या ‘या’ मोठ्या माजी खेळाडूचा ऋषभ पंतला सल्ला

मुंबई | दिल्ली कॅपिटल्स आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रिषभ पंत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर त्यानं भारतीय संघात स्थान मिळवलं आहे. काही वर्षातच त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव गाजवलं आहे. त्याची जगभरातून स्तुती होत असते.यातच आता भारताचा यशस्वी कर्णधार आणि माजी खेळाडू कपिल देव यांनी सल्ला दिला आहे.

रिषभ पंत अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे, अलीकडे त्याच्या खेळात कमालीची सुधारणा देखील झाली आहे. फक्त त्याने कोणताही शॉट खेळण्यापूर्वी पुरेसा वेळ घ्यायला हवा. प्रत्येक शॉट मोठा न खेळता काही वेळेस बॅकफुटवर खेळणे ही महत्त्वाचे आहे. मी रोहितबाबतही हेच म्हणायचो. त्याच्याकडेही बरेच शॉट असताना तो त्यांचा वापर करत नव्हता. पंतने मात्र असं न करता वेळ घेऊन खेळणे गरजेचे आहे, असं कपिल देव म्हणाले आहेत.

आपल्या चुका दुरुस्त करुन वेगात पुढे जाण्याचं कसब रिषभजवळ आहे. मागील काळात त्याने ते कसब संपूर्ण जगाला दाखवून दिलंय. कर्णधार चुका करतात, तशा चुका रिषभही करेल पण तो चुकांमधून शिकत जाईल आणि एक दिवस भारताच्या सर्वोत्तम कर्णधारांमध्ये रिषभचं नाव असेल, असं सुनिल गावस्कर म्हणाले होते.

दरम्यान, मी कसोटी क्रिकेटचा मोठा फॅन आहे, मला संपूर्ण दिवसाचा खेळ पाहायला फार आवडतं. जर कामामुळे मला एखादा सामना पाहयला नाही मिळाला तर, मी हाईलाइट्स बघतो. असं करुन मी जास्तीत जास्त कसोटी सामन्यांचा आनंद घेतो, असं देखील कपील देव म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

पक्षाने किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत- चंद्रकांत पाटील

‘मराठा आरक्षणासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा’; संभाजीराजेंची पवारांकडे मागणी

फोन वरुन ओळख, लाॅजवर भेट अन् नंतर घडला धक्कादायक प्रकार

नेहरूंच्या स्मृतीदिनी वाजपेयींचा व्हिडीओ शेअर करत जयंत पाटलांचा भाजपला टोला, पाहा व्हिडीओ

नदीवर पाणी प्यायला गेलेल्या कुत्र्यावर मगरीनं केला हल्ला अन्…, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More