बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रिषभ पंतची ऐतिहासिक कामगिरी; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू

नवी दिल्ली | आयसीसी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं नुकतंच टेस्ट रॅंकिंग जाहीर केलं आहे. फलंदाजाच्या पहिल्या 10 जणांच्या यादीत टीम इंडियाच्या 3 खेळाडूंचा समावेश आहे. या 10 खेळाडूंच्या यादीत भारतीय कर्णधार विराट कोहली,  भारताचा सलामवीर रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचा समावेश करण्यात आला आहे. ही यादी जाहीर होताच रिषभने आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंतने आयसीसीच्या टेस्ट रॅंकिंगमध्ये 6 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला यष्टीरक्षक खेळाडू ठरला आहे. रिषभ पंतने इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील 4 सामन्यात 1 शतक आणि 2 अर्धशतक ठोकलं होतं. या मालिकेत त्यानं 280 धावा केल्या होत्या. तर मोक्याच्या क्षणी भारतासाठी धावून येत भारताला विजय मिळवून दिला होता.

जाहीर झालेल्या टेस्ट रॅंकिंगमध्ये विराट कोहलीने आापलं 5वं स्थान कायम ठेवलं आहे. तर रोहित शर्माने 1 पायदानाची झेप घेत 8 वं स्थान प्राप्त केलं आहे. न्यूझीलंडचा केन विलियम्सन आपलं पहिलं स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरला आहे. दुसऱ्या क्रमांकावर स्टीव्ह स्मिथ, तिसऱ्या क्रमांकावर मार्नस लाबुशेन विराजमान आहे. तर इंग्लंडचा कर्णधार जो रुट चौथ्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोघांना 1 स्थानाचं नुकसान झालं आहे. पुजारा 14 व्या तर रहाणेची 15 व्या स्थानी घसरण झाली आहे. तर गोलंदाजीत फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने आपलं दुसरं स्थान कायम राखलं आहे.

थोडक्यात बातम्या-

आसाराम बापू आयसीयूमध्ये दाखल; काही दिवसांपुर्वी झाला होता कोरोना

‘मराठा आरक्षण हा पेटवापेटवीचा विषय नाही’; सामनातून विरोधकांवर टीकेचे बाण

आसामच्या मुख्यमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार?; भाजपमध्ये संभ्रम

दिल्लीनंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ 7 शहरात’ महिंद्रांनी सुरू केली ‘ऑक्सिजन ऑन व्हिल’ सेवा

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ; निवडणूक संपताच दरवाढीला सुरुवात

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More