बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रिषभ पंतच्या ‘त्या’ शॉटचा सातासमुद्रापार जलवा, न्यूझीलंडच्या बॅटसमनने मारला रिव्हर्स स्कूप, पाहा व्हिडीओ

मुंबई |  रिषभ पंतचे रिव्हर्स स्कूप शॉट चर्चेचा विषय ठरले आहेत. रिषभ पंतच्या या शॉटची क्रेझ जगभरात पोहोचली आहे. न्यूझीलंडचा फलंदाज डेवोन कॉनवे यानं देखील रिव्हर्स स्कूप शॉट मारला. रिषभ पंतने कसोटी आणि टी-20 मालिकेतही इंग्लंडच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी केली होती. इंग्लंडचे प्रमुख गोलंदाज जेम्स अँडरसन आणि जोफ्रा आर्चर यांची धुलाई देखील रिषभ पंतनं केली होती.

न्यूझीलंडचा फलंदाज डेवोन कॉनवे याने रविवारी बांग्लादेश विरोधातील मॅचमध्ये हा शॉट लगावला. न्यूझीलंड आणि बांग्लादेश यांच्यामध्ये टी-20 मालिका सुरु आहे. या मॅचमध्ये बांग्लादेशचा गोंलदाज मुस्ताफिजूर रहमानच्या गोलंदाजीवर डेवोन कॉनवे याने रिव्हर्स स्कूप शॉट मारला. तो थेट सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडला. डेवोन कॉनवे याने 52 बॉलमध्ये 92 धावा केल्या.

न्यूझीलंड आणि बांग्लादेश यांच्यामध्ये हॅमिल्टन येथील मैदानावर टी-20 सामना खेळवण्यात आला. कॉवेनच्या फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 210 धावा केल्या. विल यंग याने देखील 53 धावा केल्या. बांग्लादेशला 20 ओव्हरमध्ये 8 गड्यांच्या मोबदल्यात 144 धावा करता आल्या.

दरम्यान, भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, शार्दूल ठाकूर यांनी संकटसमयी केलेल्या जबरदस्त फलंदाजीमुळे टीम इंडियाला पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलं. भारतीय संघाने टीम इंडियाला 330 धावांचं आव्हान दिलं आहे. भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांच्या माऱ्याला कडवी झुंज देत 329 धावांचा डोंगर उभा केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

गब्बर आणि हिटमॅन दोघंही सुपरहिट; केला ‘हा’ मोठा कारनामा

“उद्धव ठाकरेंना कणा नाही, आता नवीन सरकार यावं”

शरद पवार-अमित शहा भेट खरोखर झाली का?; अमित शहांचं सर्वात मोठं वक्तव्य

संजय राऊतांकडून ‘अपघाती गृहमंत्री’ म्हणून उल्लेख, गृहमंत्र्यांना प्रश्न विचारल्यावर पाहा काय झालं!

शरद पवारांनी अहमदाबादमध्ये जाऊन अमित शहांची भेट घेतली?; राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More