बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देशात आणीबाणी लागू करा, लष्कर बोलावून परिस्थिती नियंत्रणात ठेवा”

मुंबई | कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात आणीबाणी लागू करावी, अशी मागणी बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी केली आहे

आज हे होत आहे, उद्या काय होणार आहे? म्हणूनच आपल्याला सैन्याच्या मदतीची गरज आहे असं मी म्हणतो आहे, असं ऋषी कपूर यांनी यांनी म्हटलं आहे. ऋषी कपूर सातत्याने कोरोना संसर्गाविषयी आणि त्या परिस्थितीत सुरु असलेल्या उपाययोजनांवर आपली मतं ट्विटद्वारे मांडली आहेत.

ऋषी कपूर यांनी याआधी देशभरात सुरु असलेल्या बनावट आणि अस्वच्छ मास्कच्या उत्पादनावरही बोट ठेवलं होतं. पत्रकार मधू तेहरान यांचं एक ट्विट रिट्विट करत त्यांनी त्यावर तात्काळ कारवाईची मागणी केली होती.

दरम्यान, कोरोनाच्या संसर्गाची भीती आणि लॉकडाऊनमुळे घरात बंद असल्याने लोक नैराश्यात आहेत. त्यामुळे त्यांना थोडा आराम मिळावा म्हणून दारुची दुकानं सुरु करा, असं मत ऋषी कपूर यांनी व्यक्त केलं. यानंतर त्यांच्यावर टीकाही झाली होती.

 

ट्रेंडिंग बातम्या-

मुंबईत 16 नवे कोरोनाग्रस्त; महाराष्ट्रातील आकडा 320 वर

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार; मृत्यूमध्ये चीनलाही मागं टाकलं

महत्वाच्या बातम्या-

दिल्लीतील ‘तब्लिग-ए-जमात’मध्ये सहभागी झालेले 199 जण महाराष्ट्रातील; संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु

आधी युद्ध कोरोनाविरुद्ध! यवतमाळच्या पोलिसानं घेतला ‘हा’ कौतुकास्पद निर्णय

तरुणांनो सावधान, तुम्हालाच आहे कोरोनाचा सर्वाधिक धोका

 

टेलिग्रामवर सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच पुढील लिंकवर क्लिक करा- https://t.me/thodkyaatNews

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More