बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी खूप वाईट स्वप्न पाहतोय, असं मला वाटतंय; ऋषी कपूर यांच्या जाण्याने अक्षयला शोक अनावर

मुंबई |  आदल्या दिवशी इरफान खान आणि आज ऋषी कपूर यांच्या जाण्याने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. इरफान खान यांच्या दुखा:तून बॉलिवूडवासी आणि त्याचे करोडो चाहते बाहेर पडत नाहीत तोपर्यंतच ऋषी कपूर कायमचं हे जग सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेले आहेत. अभिनेता अक्षय कुमारला ऋषी कपूर यांच्या जाण्याने फार दु:ख झालं आहे.

असं वाटतंय की मी खूप वाईट स्वप्न पाहतोय. ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी खूप चटका लावणारी आहे. मी या वृत्ताने खूप निराश झालो आहे. ऋषी कपूर यांंचं जाणं माझ्यासाठी अत्यंत दुख:द आहे, असं अक्षयने म्हटलं आहे. ऋषी कपूर खूप चांगले मित्र होते. माझ्या कुटुंबाचे ते खूप जवळचे होते. त्यांच्या जाण्याने मला खूप मोठा धक्का बसला आहे. मी कपूर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. त्यांना आदरांजली, असं अक्षयने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

बॉलिवूडचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही ऋषी कपूर यांच्या निधनानंतर एक भावूक ट्विट केलं आहे. तो गेलाय आणि मी उध्वस्त झालोय, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे. या ट्विटमधून त्यांची अवस्था काय झाली आहे, हे दिसून येत आहे.

बॉबी, चांदणी, नगीना, दिवाना, प्रेमरोग, अमर अकबर अँथोनी अशा एक ना अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. मेरा नाम जोकर या चित्रपटामध्ये त्यांनी अत्यंत छोटं पण महत्त्वपूर्ण काम केलं. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत फार मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना कलाकार व्यक्त करत आहेत.

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More