पत्रकार फुकटची दारु प्यायला येतात- ऋषी कपूर

मुंबई | पत्रकार फुकटची दारु प्यायला येतात, असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेते ऋषी कपूर यांनी केलंय. राज कपूर यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात हा प्रकार घडला. 

प्रकाशन सोहळ्यावेळी काही पत्रकार स्वच्छतागृहाकडे जात होते. यावेळी स्वच्छतागृहातून बाहेर पडणाऱ्या ऋषी कपूर यांनी त्यांना हटकलं आणि त्यानंतर शेरेबाजी केली. तसेच त्यांच्या सुरक्षारक्षकानेही पत्रकारांना कार्यक्रमस्थळावरुन निघून जाण्यास सांगितलं.  

दरम्यान, संतप्त झालेल्या पत्रकारांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. आयोजकांनी समजावण्याचा प्रयत्न करुन देखील पत्रकारांनी या कार्यक्रमातून काढता पाय घेतला.