Rishi Kapoor | दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी बॉलीवुडमध्ये एक काळ गाजवला आहे. त्यांच्या लुक्समुळे अनेक तरुणी तेव्हा घायाळ व्हायच्या. त्याकाळी प्रत्येक अभिनेत्री त्यांच्यासोबत काम करण्यासाठी आतुर असायच्या. अशातच एका अभिनेत्रीला ऋषी कपूर यांच्यासोबत चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याची संधी मिळाली.
या अभिनेत्रीचा पहिलाच चित्रपट सुपरहीट ठरला होता. मात्र, त्यानंतर झालेला वाद हा प्रचलित आहे. 70 च्या दशकात ऋषी कपूर यांच्या करिअरमधील ब्लॉकबस्टर चित्रपटातुन एका अभिनेत्रीने डेब्यू केला होता.
अभिनेत्री काजल किरण यांचा गंभीर आरोप
मात्र, चित्रपट झाल्यानंतर या अभिनेत्रीने ऋषी कपूर यांच्यासोबत चित्रपटाच्या दिग्दर्शकांवरही गंभीर आरोप केले होते. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कुणी नसून काजल किरण या आहेत. 1977 मध्ये दिग्दर्शक नासिर हुसैन यांनी ऋषी कपूर यांना घेऊन ‘हम किसी से कम नहीं’ हा चित्रपट बनवला होता.
याच चित्रपटातून काजल किरण यांना प्रसिद्धी मिळाली होती. हा चित्रपट तर सुपरहीट ठरला पण, त्यानंतर अभिनेत्रीला काम मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागली होती. सतत मिळणाऱ्या अपयशाला अभिनेत्रीने ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांना जबाबदार ठरवलं होतं.
ऋषी कपूरसोबत चित्रपटात केलं होतं काम
ऋषी कपूर यांच्या स्टारडमने तिचं करीअर उद्ध्वस्त झाल्याचा आरोप अभिनेत्रीने केला होता. या आरोपांवर नंतर ऋषी कपूर यांनी देखील प्रत्युत्तर दिलं होतं. ती आपल्या खराब नशीबाचं खापर दुसऱ्यावर फोडण्यासाठी बहाणाच शोधत होती, असं ऋषी कपूर म्हणाले होते.
तसंच डिंपल कपाडिया आणि जया प्रदा यांनी माझ्यासोबतच डेब्यू केलं होतं आणि त्या यशस्वी झाल्या. त्यामुळे कोणाचे यश किंवा अपयश अवलंबून असण्याइतका मी महत्त्वाचा नाही, असंही ऋषी कपूर (Rishi Kapoor) म्हणाले होते. इतकंच नाही तर, अभिनेत्रीने दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्यावर देखील आरोप केले होते.
News Title – Rishi Kapoor was accused by actress Kajal Kiran
महत्त्वाच्या बातम्या-
नागपूर ते थेट मालदीव,डॉली चहावालाने समुद्र किनारी उघडली चहाची टपरी; Video व्हायरल
रोहित पवार यांच्या एका ट्विटने पोलीस प्रशासन हललं, हजारो विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा
प्रसिद्ध रिलस्टार सनी जाधववर बलात्काराचा आरोप; सोशल मीडियावर खळबळ
“दलित बुद्धांनो आता तरी शहाणे व्हा!”, प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
महिलांच्या ‘या’ सवयींमुळे पतीचं आयुष्य होतं बरबाद!