बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना रुग्णांना बेल्स पाल्सीचा धोका?; ‘ही’ लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा

मुंबई | युनिव्हर्सिटी हॉस्पिटल क्लीव्हलँड मेडिकल सेंटर आणि केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन या संस्थांमधल्या शास्त्रज्ञांनी एक नवं संशोधन केलं आहे. कोरोना रुग्णांना बेल्स पाल्सीचा जास्त असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.

बेल्स पाल्सी म्हणजे चेहऱ्याला लकवा मारणं. कोरोना रुग्णांमध्ये याचा धोका सातपटीने वाढतो. कोरोनाच्या एक लाख रुग्णांपैकी 82 जणांना बेल्स पाल्सी विकार झाल्याचं संशोधनात आढळलं. ‘दैनिक भास्कर’ने या संदर्भातील वृत्त दिलंय.

3 लाख 48 हजार कोरोना पेशंट्सपैकी 284 पेशंट्सना बेल्स पाल्सी झाल्याचं निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदवलं आहे. यापैकी 54 टक्के पेशंट्सना त्यापूर्वी कधीच बेल्स पाल्सीचा त्रास झाला नव्हता. उर्वरित 46 टक्के पेशंट्सना पूर्वी बेल्स पाल्सीचा त्रास झाला होता, अशी माहिती समोर आली आहे. हा त्रास उद्भवल्यावर दोन महिन्यांत यावर योग्य उपचार करण्यात आले, तर हा विकार लवकर बरा होऊ शकतो, असं संशोधकांनी म्हटलंय.

बेल्स पाल्सी हा शरीरातल्या स्नायूंशी निगडित असलेला अर्धांगवायूसदृश विकार आहे. अर्धांगवायूमध्ये अर्धं शरीर निकामी होतं. बेल्स पाल्सीमध्ये चेहरा एका बाजूने लटकल्यासारखा होतो. पेशंटला गाल फुगवण्यास, गालाची हालचाल करण्यास त्रास होतो. याचा डोळ्यांच्या पापण्यांवर आणि भुवयांवरही परिणाम होतो.

थोडक्यात बातम्या- 

“मुख्यमंत्र्यांना तीन पत्र लिहली, उद्धव ठाकरे विसरभोळे झालेत की काय?”

‘…तोपर्यंतच आम्ही विरोधात बसणार आहोत’; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

भारत-श्रीलंका मालिकेवर कोरोनाचं सावट; वनडे आणि टी 20 मालिकेच्या वेळापत्रकात बदल

“कोरोनापासून कधीच सुटका होणार नाही, तो पूर्णपणे आपल्यातून जाणार नाही”

देशात ‘समान नागरी कायदा’ लागू करण्याची वेळ आली- दिल्ली उच्च न्यायालय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More