Heart Attack l हिवाळ्यात अनेक आजार डोकं वर काढत आहेत. कारण हिवाळ्यात वातावरणातील प्रदुषणाचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे आता हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे हिवाळ्यात नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आता आपण हिवाळ्यात हृदयविकाराच्या झटक्यापासून कसा बचाव करायला हवा हे सविस्तर जाणून घेऊयात…
हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका अधिक :
हिवाळ्यात तापमान हे प्रचंड प्रमाणात घटते. त्यामुळे शरीरात देखील याचे परिणाम दिसून येतात. कारण हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या हिवाळ्यात आकुंचन पावतात. यामुळे रक्त हळूहळू हृदयापर्यंत पोहोचते. मात्र ज्यावेळी शरीरातील रक्तपुरवठा मंदावतो त्यावेळी रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. त्यामुळे रक्तपुरवठा देखील खंडित होऊन हार्ट अटॅक येतो.
तसेच हिवाळ्यात शरीरातील उष्णता टिकवून ठेवणे देखील कठीण होते. अशा परिस्थितीमध्ये हायपोथर्मिया देखील होऊ शकतो. ज्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकते. मात्र याचा परिणाम म्हणून हृदयविकाराच्या झटका येण्याची शक्यता जास्त असते.
Heart Attack l हृदयविकाराच्या झटक्याचा धोका टाळण्यासाठी काय करावे? :
उबदार कपडे घाला : हिवाळ्यात थंडीचं प्रमाण जास्त असल्याने उबदार कपडे घालायला प्राधान्य द्या. यामुळे हिवाळ्यात तुमचे हृदय सुरक्षित ठेवण्यास मदत होते.
दररोज व्यायाम करा : हिवाळ्यात शरीरातील उष्णता नियंत्रित करण्यास आणि तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करा. मात्र थंड वातावरणात व्यायाम करणे शक्यतो टाळा.
पौष्टीक आहार घ्या : हिवाळ्यात एनर्जी जास्त लागत असते. त्यामुळे ताजी फळे, भाज्या, कडधान्ये, शेंगा, संपूर्ण धान्य, पालक, गाजर आणि ब्रोकोली असे पदार्थ खाण्यावर भर द्या.
कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन : हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी सीपीआर तंत्राबद्दल माहिती जाणून घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मद्यपान टाळा.
News Title- risk of heart attack highest in winter
महत्वाच्या बातम्या-
वर्षाच्या शेवटी RBI चा सर्वसामान्यांना सर्वात मोठा धक्का!
फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी?, मोठी अपडेट समोर
शपथविधी होताच वाहनचालकांना दिलासा, राज्यात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त?
लाडक्या बहीणींसाठी गुड न्यूज; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय
आज धनवृद्धीचे योग तर ‘या’ राशींना मिळेल प्रेमाची साथ!