राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंच्या जीवाला धोका, पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी

रायगड |  राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका निनावी पत्राद्वारे त्यांना ही धमकी देण्यात आलीय.

सुनील तटकरेंचे पुत्र आमदार अनिकेत तटकरे यांच्याशी ‘थोडक्यात न्यूज’ने संपर्क साधला असता, विधानरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांकडे सुनील तटकरेंची सुरक्षा वाढविण्याची मागणी करणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिलीय.

राष्ट्रवादीच्या म्हसळा कार्यालयात त्यांना हे पत्र आलेले आहे. पूर्ववैमनस्यातून धोका असल्याचा या पत्रात उल्लेख केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष नाझीम हासवारे यांनी या धमकीविरोधात म्हसळा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

लालकृष्ण अडवाणींना तिकीट न दिल्याने काँग्रेसचा भाजपवर बोचरा वार!

प्रवीण छेडांच्या भाजप प्रवेशानं सोमय्यांचं तिकीट कापलं जाण्याची जोरदार चर्चा!

शिवसेनेची 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ‘यांना’ मिळालीय संधी….

संजय काकडेंचं बंड झालं थंड…. काँग्रेसवारी टळली!

माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने केला शिवसेनेत प्रवेश!