महाराष्ट्र मुंबई

“…तरी देखील मी माझ्या मुलाच्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागते”

मुंबई | ‘बिग बॉस’ या रियालिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू या स्पर्धकाने मराठी भाषेची चीड येत असल्याचं वक्तव्य केलं होतं.या प्रकरणावर जान कुमारची आई रीटा भट्टाचार्य यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्या मुलानं मराठी भाषेचा अपमान केला नाही. केवळ शोच्या टीआरपीसाठी हा मराठीचा मुद्दा उचलून धरला जातोय, असा दावा रीटा यांनी केला.

जानने मराठी भाषेबद्दल जे वाक्य उच्चारलं त्याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने लावला जातोय. खरं तर जान मराठी भाषेवर नव्हे तर निक्की आणि राहुल यांच्यावर संतापला होता. तो कधीही मराठीचा अपमान करणार नाही, असं रीटा यांनी म्हटलं आहे.

माझा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. माझ्या पतीचं संपूर्ण करिअर महाराष्ट्रातच घडलं आहे. आम्ही आमच्या महाराष्ट्रीय मित्रमंडळींसोबत मराठीतच संभाषण करतो. मग माझ्या मुलाला मराठीचा राग का येईल? तरी देखील मी माझ्या मुलाच्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेची हात जोडून माफी मागते, असं रीटा म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-

“अतिवृष्टीच्या मदतीमध्ये वाढ करावी, अन्यथा सरकारला हादरवणारे आंदोलन करु”

“सुनील तटकरेंना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल”

“त्यांना वाटलं की संधी आली अशोक चव्हाणला ठोका, पण…” 

एक बाप म्हणून मी माफी मागतो, मुलगा 27 वर्षांपासून माझ्यासोबत नाही- कुमार सानू 

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या