बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माझी ‘परफेक्ट वाईफ’ म्हणत रितेशने शेअर केला जेनेलियाचा व्हिडीओ

मुंबई | बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Actor Ritesh Deshmukh) आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख हे सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतात. नेहमी ते सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असतात. आता रितेश देशमुखने पुन्हा एकदा परफेक्ट वाईफ म्हणत जेनेलियाचा व्हिडीओ  इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

रितेशने जेनेलियाचा व्हिडीओ शेअर करत तिच्या विसरभोळेपणाची टिंगल उडवली आहे. या व्हिडीओला एका बॅकग्राऊंड व्हॉईस जोडला आहे. ज्यामध्ये माय परफेक्ट वाईफ असं म्हटलं आहे. शिवाय ती इतकी परफेक्ट आहे की ति स्वत: फोन पर्समध्ये असतानाही दुसरीकडे शोधत राहते, असंही बॅकग्राऊंडमध्ये म्हटलं आहे.

रितेशने शेअर केलेल्या व्हिडीओला प्रसिद्ध स्टॅंडअप कॉमेडीयन स्टीव्ह ट्रेव्हिनो यांचा बॅकग्राऊंड व्हॉईस दिला आहे. त्याचा परफेक्ट वाईफ, नेव्हर मेक सिली मिस्टेक, या शोमधील या ओळी आहेत. जेनेेलियाला नेहमी तिच्या वस्तू विसरण्याची सवय आहे. त्यामुळे रितेशने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता रितेश देशमुखनं त्याच्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली आहे. आज रितेशचे जगभरात चाहते आहेत. रितेश सोशल मीडियावर सक्रिय असलेला पहायला मिळत असतो. तो नेहमी वेगवेगळे व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असतो. आता रितेशचा आणि जेनेलियाचा हा व्हिडीओही तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ-

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

थोडक्यात-

“भाजपचा कार्यकर्ता ‘अरे ला, का रे’ करायला घाबरणार नाही”

“कारस्थान करून निवडणूक जिकंता येईल असं वर्गणी चोरांना वाटतं होतं पण…”

धक्कादायक! Omicronमुळे देशात दोन बळी

इंधन दरात काय बदल झाला?; वाचा पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

सतीश सावंत यांच्या पराभवानंतर नितेश राणेंची पहिली पोस्ट, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More