बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चाहत्यानं दिलेलं गिफ्ट पाहून रितेश देशमुख झाला भावूक; पाहा व्हिडीओ

मुंबई | बाॅलिवूडचा अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतो. वेगवेगळ्या आठवणी तो नेहमी शेअर करत असतो. तसेच तो नेहमी सोशल मीडियामधून त्याच्या वडिलांच्या आठवणीला उजाळा देत असतो. तर सोशल मीडियावर रितेशचे अनेक चाहते देखील आहेत. अशाच एका चाहत्यानं रितेशला एक अनोख गिफ्ट दिलं आहे. ते पाहून रितेश भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

गौरव भाटकर नावाच्या एका कलाकाराने रितेशला एक पेन्टिंग गिफ्ट केली आहे. या पेन्टिंगमध्ये गौरवने विलासराव देशमुख यांचं चित्र रेखाटलं आहे. हे पेन्टिंग पाहून रितेश त्याच्या वडिलांच्या आठवणीत रमलेला दिसला. इंस्ट्राग्रामवर त्याने पेन्टिंग पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे.

धन्यवाद गौरव भाटकर, तुमचं आर्टवर्क माझ्या मनाला भिडलं आहे. मला मिळालेल्या सर्व खास गोष्टींपैकी ही एक गोष्ट असेल. नम्र आणि कृतज्ञ, असं रितेशने फोटो शेअर करत म्हटलं आहे. तर गौरव भाटकरने रितेशचा व्हिडीओ इंस्ट्राग्रामवर शेअर केला आहे. त्यात तो भावूक झालेला दिसत होता.

माझ्यासाठी हा महत्वाचा दिवस आहे. गौरवने या पेन्टिंग मधून भावना आणि क्षण चांगल्या प्रकारे कॅप्चर केलं आहे. माझ्या आयुष्यातील सार या पेन्टिंगमध्ये आहे. माझे वडिल माझ्यासाठी काय आहेत हे यातून कळत आहे, अशा भावना रितेशने यावेळी बोलताना व्यक्त केल्या.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या- 

“कोरोनाचं महाराष्ट्रावर प्रेम आहे की ठाकरे सरकारचं कोरोनावर”

‘ही’ थ्री-व्हीलर इलेक्ट्रीक कार 2 रूपयात 5 किमी धावणार!; जाणून घ्या किंमत…

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षा गायकवाड यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती!

राज्यातील ‘या’ भागात हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा!

चॉकलेटचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीसोबत नराधमाने केलं धक्कादायक कृत्य!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More