“राजे माफ करा..”; शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेनंतर रितेश देशमुखची पोस्ट

Chhatrapati Shivaji Maharaj Statue | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याने राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. 4 डिसेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. पण उद्धाटनानंतर आठ महिन्यातच महाराजांचा पुतळा कोसळला. यामुळे शिवप्रेमीमध्ये प्रचंड नाराजी आहे. विरोधी गटाकडूनही आता राज्य सरकारवर टीका केली जात आहे. यावरून आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच पेटलं आहे.(Chhatrapati Shivaji Maharaj Statue)

बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख देखील या घटनेवर व्यक्त झाला आहे. त्याने सोशल मीडियावर अवघ्या तीन शब्दांची पोस्ट केली आहे. त्याच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. रितेशची ही मोजक्या शब्दातली पोस्ट आता तूफान व्हायरल देखील झाली आहे.

रितेश देशमुखची पोस्ट-

‘राजे माफ करा’, अशी पोस्ट रितेशने केली आहे. त्यावर चाहते देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. रितेशने या पोस्टद्वारे महाराजांची माफी मागितली आहे. दरम्यान, या प्रकरणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

देशाचे पंतप्रधान जेव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल जनतेला खात्री असते. परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे. विशेष म्हणजे या स्मारकाचे उद्घाटन प्रधानमंत्री मा.नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते झाले होते. ज्याअर्थी एक वर्षही पुर्ण न होता हा पुतळा कोसळला त्याअर्थी त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे. या अर्थाने हि प्रधानमंत्री महोदयांची आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.(Chhatrapati Shivaji Maharaj Statue)

नेमकं घडलं काय?

नौदल दिनानिमित्त 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल विभागाने राजकोट परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला होता. या स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून येथे वादळी वारे आणि मुसळधार पाऊस सुरू आहे. यातच काल दुपारी वादळीवाऱ्यामुळे पुतळा कोसळला. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी याची माहिती प्रशासनास दिली. याप्रकरणी आता प्रचंड संताप व्यक्त केला जातोय. (Chhatrapati Shivaji Maharaj Statue)

News Title –  Riteish Deshmukh post on Chhatrapati Shivaji Maharaj Statue

महत्त्वाच्या बातम्या-

पुढील 48 तास धोक्याचे, IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट

दहीहंडीला मिळाली आनंदवार्ता! सोन्याचे भाव घसरले, जाणून घ्या आजचे दर

BCCI चं ऐतिहासिक पाऊल, क्रिकेटपटूंसाठी जय शाह यांची सर्वात मोठी घोषणा!

“आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा?”; मालवण घटनेने राज ठाकरेंचा संताप

आज दहीहंडीचा सण, श्रीकृष्णाची कृपा कुणावर असणार?; वाचा आजचे राशीभविष्य