Riteish Deshmukh | लोकसभा निवडणुकांचा निकाल 4 जूनरोजी जाहीर झाला आहे. या निकालात एनडीएला 293 तर इंडिया आघाडीला 232 जागा मिळाल्या आहेत. कॉँग्रेसने यावेळी आपली कामगिरी सुधारत तब्बल 99 जागांवर विजय मिळविला आहे.
महाराष्ट्रात देखील कॉँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात कॉँग्रेसने 17 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी कॉँग्रेसने 13 जागा आपल्या नावे केल्या आहेत. त्यामुळे कॉँग्रेस सर्वाधिक 13 जागा मिळविणारा पक्ष झाला आहे. या निकालानंतर बॉलीवुड अभिनेता रितेश देशमुख याने एक पोस्ट केली आहे.
रितेश देशमुखने दिला विलासरावांच्या आठवणींना उजाळा
रितेशने (Riteish Deshmukh) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विलासराव देशमुख हे कॉँग्रेसचे दिग्गज नेते राहिले आहेत. त्यांचे तीन सुपुत्र आहेत. धीरज देशमुख आणि अमित देशमुख दोघेही राजकारणात आहेत. दोघेही कॉँग्रेसचे नेते आहेत.
तर, रितेश देशमुख याने जरा वेगळा मार्ग निवडत अभिनयात आपलं नशीब आजमावलं. रितेश नेहमीच राजकीय घडामोडींबाबत देखील पोस्ट करत असतो. ‘भारत जोडो यात्रा’ दरम्यान देखील रितेशने काही पोस्ट केल्या होत्या. आता कॉँग्रेसच्या विजयानंतर देखील त्याने एक पोस्ट केली आहे.
Remembering My Father .. #VilasraoDeshmukh pic.twitter.com/f17hXcKHK8
— Riteish Deshmukh (@Riteishd) June 5, 2024
“कॉँग्रेस आश्वासनाच्या नाही तर कामाच्या बळावर मत मागते”
रितेश याने विलासराव देशमुख यांचा एक जुना व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये विलासराव म्हणत आहेत की, “कॉँग्रेस संपणार असे म्हणणारे संपले पण, कॉँग्रेस काही संपले नाही.’, त्याची ही पोस्ट (Riteish Deshmukh) आता वाऱ्यासारखी व्हायरल झाली आहे.
“कॉँग्रेसला प्रचंड विस्तारीत रूप प्रारूप झाले आहे. त्याग, बलिदान हा कॉँग्रेसचा इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा कॉँग्रेसला इतिहास आहे. कॉँग्रेस अशी कुणाला संपवू संपत नाही. आजही कॉँग्रेसचा हात आम आदमीसोबत आहे. हीच कॉँग्रेसची भूमिका आहे. कॉँग्रेस कामाच्या बळावर मत मागते, आश्वासनाच्या बळावर नाही.”, असं विलासराव या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत. हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत आहे.
News Title : Riteish Deshmukh post went viral
महत्त्वाच्या बातम्या-
‘लोकसभेतील यशामागे तुमचं अफाट कष्ट अन्..’; उद्धव ठाकरेंनी फोन करत मानले किरण मानेंचे आभार
राज्यातील सर्वात श्रीमंत, गरीब, तरुण व वयोवृद्ध खासदार कोण; जाणून घ्या एका क्लिकवर
नवरा भाजपकडून, घटस्फोटित बायको तृणमूलकडून उभी, पाहा कुणाचा झाला विजय
पवार घराण्याला स्विकारावा लागला तिसरा पराभव, पाहा तिघांची नावं
सासऱ्याच्या विरोधात उभ्या होत्या दोन सुना, अत्यंत धक्कादायक लागला निकाल